महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

"एक पप्पू मेरी जिंदगी में आए"; कंगना रणौतनं उद्धव ठाकरेंना डिवचलं - Kangana Ranaut on Uddhav Thackeray - KANGANA RANAUT ON UDDHAV THACKERAY

Kangana Ranaut on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकांची सध्या देशभरात रणधुमाळी सुरू आहे. आरोप, प्रत्यारोप, टीका, टीपण्णीनं राजकारण तापलंय. काही ठिकाणी तर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका देखील केली जातीय. अशाकच आता अभिनेत्री कंगना रणौतनं थेट हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना डिवचलंय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 6:04 PM IST

Updated : Apr 11, 2024, 6:58 PM IST

कंगना रणौत भाषण

मंडी(हिमाचल प्रदेश) Kangana Ranaut on Uddhav Thackeray : भाजपानं अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी दिलीय. त्यामुळं कंगनानं आता जोरदार प्रचार सुरू केलाय. हिमाचल प्रदेशातील सत्ताधाऱ्यांवर कंगना जोरदार हल्लाबोल करताना दिसून येतील. एवढ्यावरच न थांबता कंगनानं हिमाचलमधून थेट मुंबईत बसलेल्या उद्धव ठाकरेंनाही टार्गेट केलंय.

उद्धव ठाकरेंचा 'पप्पू' असा उल्लख :"मला आतापर्यंत खूप पप्पू भेटले आहेत. त्यातील एक पप्पू दिल्लीत आहेत. तर एक पप्पू मुंबईत बसले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मला धमकावलं, घाबरवलं तसंच माझं मुंबईतील घर आणि कार्यालयही तोडलं. तरीसुद्धा मी आज खंबीरपणे उभी आहे," असं म्हणत अभिनेत्री कंगनानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत त्यांचा 'पप्पू' असा उल्लेख केलाय.

कंगना आणि शिवसेना वाद : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत विरुद्ध शिवसेना हा वाद देशभरात गाजला होता. कंगनानं मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केल्यापासून ते तिने मुंबईला पीओके आणि नंतर पाकिस्तानाची उपमा देईपर्यंत हा वाद सुरू होता. मुंबईत येण्यास मला नकार देण्यासाठी मुंबई कुणाच्या बापाची नाही, असं खुलं आव्हान कंगनानं शिवसेनेला दिलं होतं. तेव्हा मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल : 2019 मध्ये भाजपा-शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र, सत्ता स्थापन करताना शिवसेनेनं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. त्यास भाजपानं नकार दिल्यानं शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारवर अभिनेत्री कंगना रनौतनं सडकून टीका केली होती. मुंबईत सुरक्षित वाटत नसून हा एक पाकिस्तानचा भाग असल्याचे वादग्रस्त विधान केलं होतं.

कंगनाचं कार्यालय पाडलं : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपानं अभिनेत्री कंगना राणौतला तिकीट दिल्यानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली. यासोबतच साडेतीन वर्षांपूर्वी बीएमसीनं पाडलेल्या त्यांच्या मुंबईतील कार्यालयाबाबतही चर्चा सुरू झाली. हे संपूर्ण प्रकरण 2020 मधले आहे, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू होती. कंगनानं आरोप केला होता की, मुंबई पोलीस या प्रकरणात निष्काळजीपणा करत असून, बॉलिवूडमधील काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा -

  1. रामदास तडस यांच्यावर सून पूजा तडस यांची मारहाणीसह आरोपांची सरबत्ती, तडस यांनी सर्व आरोप फेटाळले - Pooja Tadas On Ramdas Tadas
  2. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून किरण सामंत निवडणूक लढवणार? काय म्हणाले दीपक केसरकर? - Lok Sabha Election 2024
  3. जालन्यात कल्याण काळे आणि रावसाहेब दानवेंमध्ये रंगणार लढत; 2009 चा बदला घेतील का कल्याण काळे ? - Lok Sabha Election 2024
Last Updated : Apr 11, 2024, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details