रांचीPolitics of Jharkhand : झारखंडमधील महाआघाडीचे आमदार रांचीहून हैदराबादला पोहोचले आहेत. लिओनिया रिसॉर्टमध्ये त्यांच्यासाठी 70 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा तसंच अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांना गुरुवारी रात्री उशिरा राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर शुक्रवारी चंपाई यांनी झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
झारखंडमधील सत्तासंकट सुटेना! सत्ताधारी आघाडीचे 40 आमदार हैदराबादमधील रिसॉर्टमध्ये ठोकणार तळ - Jharkhand Political crisis
Politics of Jharkhand : झारखंडमधील सुमारे 40 आमदार हैदराबादला पोहोचले आहेत. या आमदारांना शहराच्या बाहेरील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. तेलंगणातील सत्ताधारी काँग्रेस पक्षानं आमदारांच्या राहण्याची व्यववस्था केली आहे.

Published : Feb 2, 2024, 9:29 PM IST
झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन :झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितलं की, हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार आदिवासींसाठी सुरू केलेल्या कामाला गती देणार आहे. चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीचं ४० आमदार दुपारी एकच्या सुमारास चार्टर्ड विमानानं हैदराबादला पोहोचले आहेत. नव्या सरकारचा शपथविधी सुरू असताना सत्ताधारी आघाडीचे आमदार बसमधून रांची विमानतळावर पोहोचले आहेत. फ्लोअर टेस्टच्या आधी हे सर्व आमदार विधानसभेत परतणार आहेत. विमानतळावर पोहोचलेल्या आमदारांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, राज्याला घटनात्मक संकटातून वाचवण्यासाठी आम्ही सुरक्षित ठिकाणी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.
- 5 फेब्रुवारीला होणार फ्लोअर टेस्ट : सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लोर टेस्टसाठी 5 फेब्रुवारी तारीख निश्चित करण्यात आली आहे. एकजूट दाखवण्यासाठी आमदारांनी एकत्र हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतल्याचं युतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. हे सर्व आमदार गेल्या चार दिवसांपासून रांचीच्या सर्किट हाऊसमध्ये थांबले होते.
- खराब हवामानामुळे विमान रद्द :आमदार गुरुवारी रात्रीच हैदराबादला जाणार होते. परंतु खराब हवामानामुळं त्यांना झारखंडमध्येच थांबावं लागलं होतं. तेलंगणात काँग्रेसचे सरकार आहे, त्यामुळं झारखंडचे आमदार हैद्राबादला सुरक्षित राहतील, अशी रणनीती आहे.
हे वाचलंत का :
- देशाच्या आर्थिक राजधानीचा तब्बल 60 हजार कोटींचा अर्थसंकल्प, निवडणुकाच न झाल्यानं यावर्षी देखील नगरसेवकांची अनुपस्थिती
- मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं सर्वेक्षण पूर्ण; मात्र दहा टक्के मुंबईकरांनी दिला सर्वेक्षणासाठी नकार
- 'महाविकास आघाडी'चे 'इंडिया आघाडी' सारखं होऊ नये, मविआत किमान समान कार्यक्रम - प्रकाश आंबेडकर