महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसचा ओमर अब्दुल्लांना धक्का ?: आज काँग्रेस आमदार घेणार नाहीत शपथ; 'या' घटनेचा करणार निषेध

काँग्रेस पक्षानं जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल काँन्फरन्सला पाठींबा दिला आहे. मात्र आज होणाऱ्या शपथविधीत काँग्रेस आमदार शपथ घेणार नसल्याचं गुलाम अहमद मीर यांनी सांगितलं.

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

Omar Abdullah Oath Ceremony
ओमर अब्दुल्ला यांच्यासह वरिष्ठ नेते (ETV Bharat)

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या निवडणुका झाल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यात येणार आहे. आज ओमर अब्दुल्ला सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असले, तरी त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या काँग्रेस आमदारांनी मात्र आज शपथ घेणार नसल्याचं जाहीर केलं. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदार आज नायब राज्यपालांसमोर शपथ घेणार नसल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

ओमर अब्दुल्ला यांच्यासह वरिष्ठ नेते (ETV Bharat)

आज काँग्रेस आमदार घेणार नाहीत शपथ :जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओमर अब्दुल्ला यांच्या जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षानं जोरदार मुसंडी मारली. नॅशनल कॉन्फरन्स या पक्षासह काँग्रेस पक्षानंही जम्मू काश्मीरमध्ये 6 जागांवर विजय संपादन केला. काँग्रेसची जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षासोबत आघाडी असल्यानं काँग्रेस पक्षाचे सहा आमदार आज शपथ घेणार होते. मात्र काँग्रेस पक्षानं पलटी मारत आज काँग्रेस आमदार शपथ घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

विशेष राज्याचा दर्जा काढल्यानं काँग्रेस पक्षाचा विरोध : "जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे काँग्रेस पक्षानं आज नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासमोर शपथ न घेण्याचं निश्चित केलं आहे. सहा आमदारांपैकी कोणीही आज शपथ घेणार नाही," असं गुलाम अहमद मीर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळ जागांवरुन मतभेद ? :काँग्रेस पक्ष ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल काँन्फरन्स पक्षाला पाठींबा देईल, मात्र आज काँग्रेसचा एकही आमदार शपथ घेणार नाही, असं गुलाम अहमद मीर यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस नॅशनल काँन्फरन्स सरकारला पाठिंबा देईल, मात्र आज शपथ घेणार नाही, असं गुलाम अहमद मीर यांनी यावेळी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळातील जागांवरून नॅशनल काँन्फरन्ससोबत मतभेद असल्याच्या बातम्यांचं त्यांनी यावेळी खंडन केलं. "मंत्रिमंडळातील जागा ही नॅशनल काँन्फरन्स-काँग्रेस आघाडीची अंतर्गत बाब आहे. मात्र आमचा मुख्य मुद्दा राज्याला विशेष दर्जा बहाल करणं हा आहे. जोपर्यंत राज्याचा विशेष दर्जा बहाल होत नाही, तोपर्यंत आम्ही मंत्रिमंडळाचा भाग होणार नाही. परंतु सहा आमदार नॅशनल काँन्फरन्स सरकारला पाठिंबा देतील,"

हेही वाचा :

  1. जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेपासून भाजपा वंचित; नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला बहुमत
  2. जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेसचं पारडं जड, कुणाची सत्ता येणार? काय सांगतो एक्झिट पोल - Jammu Kashmir Exit Poll Result
  3. जम्मू काश्मीर निवडणुका : एकीकडे वारशासाठी लढा, नव्या पिढीलाही आशा - Jammu Kashmir Elections

ABOUT THE AUTHOR

...view details