महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Women's Day 2024 : युनायटेड नेशन्सच्या 'या' थीमवर साजरा होणार वर्ष 2024 चा 'महिला दिन' - Womens Day 2024 Theme

International Womens Day 2024 : 8 मार्चला संपूर्ण जगभरात 'महिला दिन' साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या थीमच्या मदतीनं हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी युनायटेड नेशन्सच्या 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'ची थीम ही 'इंस्पायर इंक्लुजन' (Inspire Inclusion) आहे.

International Women's Day 2024
महिला दिन 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 10:44 AM IST

Updated : Mar 7, 2024, 10:50 AM IST

International Womens Day 2024 : जगभरात महिलांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' (Womens Day 2024) साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सनं 1977 मध्ये या दिनाला जगभर मान्यता दिलीय. तर 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'ची ओळख जांभळ्या रंगानं केली जाते.

आंतरराष्ट्रीय महिला दिन

जांभळ्या रंगाचा काय संबंध?: जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचे प्रतिक आहे. महिला दिनी जांभळा परिधान केल्यानं जगभरातील महिलांशी एकजुटीची भावना दिसून येते.

महिला दिनाची थीम : 2024 मध्ये, युनायटेड नेशन्सच्या 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'ची थीम 'इंस्पायर इंक्लुजन' (Inspire Inclusion) ज्याचा अर्थ आहे, जिथे प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान मिळतो. या थीमच्या आधारावरच संपूर्ण कार्यक्रमांची रुपरेषा ठरवली जाते.

आंतरराष्ट्रीय महिला दिन

महिला दिन इतिहास: संयुक्त राष्ट्र संघानं 8 मार्च 1975 रोजी आंतरराष्ट्रीय 'महिला दिन' साजरा करण्यास सुरुवात केली, परंतु त्याआधी 1909 सालीच तो साजरा करण्यात आला होता. 1909 साली अमेरिकेत पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला महिला दिन साजरा करण्यात आला होता. अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने न्यूयॉर्कमध्ये 1908 च्या गारमेंट कामगारांच्या संपाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडला. त्याचवेळी पहिल्यांदाच, 28 फेब्रुवारी रोजी महिला दिन साजरा करताना, रशियन महिलांनी पहिल्या महायुद्धाचा निषेध नोंदवला. तर 1917 मध्ये शांततेच्या मागणीसाठी रशियन महिला संपावर गेल्या. फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी संप सुरू झाला. हा ऐतिहासिक संप होता आणि रशियाच्या झारने सत्ता सोडली तेव्हा, तेथील अंतरिम सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. तर भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला.

'या' दिवसाचं महत्व: आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषत: जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करतो आणि लैंगिक असमानतेबद्दल जागरुकता वाढवतो. मुलींच्या शिक्षणात आणि समाजातील सर्व घटकांमधील लैंगिक भेदभाव दूर करणे आवश्यक आहे.

महिलांचे अधिकार : युरोपमधील महिलांनी 8 मार्च रोजी शांतता कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी रॅली काढल्या. त्यानंतर 1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्तानं संयुक्त राष्ट्र संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचं ठरविलं. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीनं विविध सदस्यांना आमंत्रित करून, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर 'महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता' या हेतून साजरा करावा यासाठी आवाहन केलं होतं.

हेही वाचा -

  1. International Womens Day : कर्नाटकातील 60 वर्षीय लक्ष्मम्मा यांनी 5,000 हून अधिक मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार
  2. international Womens Day Special 2023 : दोन मुलांचा सांभाळ करत नागपूरच्या झोयाने पटकावले मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत तिसरे स्थान
  3. International Women's Day 2023 special: प्रतिभावंत ५ भारतीय महिला दिग्दर्शिकांनी फडकत ठेवलाय महिला केंद्रित चित्रपटांचा झेंडा
Last Updated : Mar 7, 2024, 10:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details