रांची-हजारीबाहमधील छडवा धरणातून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रशांत कुमार सिन्हाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. प्रशांत कुमार हा जमशेदपूर येथील बिरसानगर येथे राहत होता. आरोपींनी प्रशांतची हत्या करून त्याचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत बांधून छडवा डॅमजवळी पुलाखाली फेकून दिला होता. पोलिसांच्या माहितीनुसार प्रशांतची पूर्वाश्रमीची प्रेमिका काजलने तिच्या प्रियकराच्या मदतीनं प्रशांत कुमारची हत्या केली. आरोपी काजल ही हजारीबागमधील न्यू एरिया येथील रहिवासी आहे. जमशेदपूरमधील बिरसानगर ठाण्याचे पोलीस आणि हजारीबागमधील पेलावल ठाण्याचे पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत अत्यंत कुजलेला मृतदेह ताब्यात घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कुमार सिन्हा हा ११ मार्च २०२४ पासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी प्रशांत कुमार बेपत्ता झाल्याची तक्रार १३ मार्चला बिरसा नगरमधील पोलीस ठाण्यात केली होती. प्रशांतच्या आईनं मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दिल्यानंतर २२ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. टेक्निकल सेल आणि नातेवाईकांकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांना तपासकरिता गुन्ह्याचे काही धागेदोरे मिळाले.
आरोपी तरुणीकडून गुन्हा कबूल-आरोपी तरुणीनं पोलिसांनी केलेल्या चौकशीत सविस्तर माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली. तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी छडवा पुलाजवळील दुसऱ्या पुलाजवळील चिखलातून कुजलेला मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी लोहसिंघा येथील पॅगोडजवळीला चौकातून तरुणीचा प्रियकर असलेल्या रौनक कुमारीला ताब्यात घेतले. काजलनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिची प्रशांत कुमाररबरोबर २०१९ पालून मैत्री होती. तिला प्रशांतबरोबरचे मैत्रीचे सबंध संपवायचे होते. मात्र, त्यासाठी प्रशांत कुमार राजी नव्हता.
गळा दाबून हत्या-मैत्रीचे संबंध तोडण्याला विरोध करत त्यानं काजलला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. प्रशांत कुमार खूप दिवसांपासून ब्लॅकमेल करत होता, असा काजलनं पोलिसांकडं दावा केला. प्रशांत कुमारला त्रासल्यानंतर काजलनं टोकाचा निर्णय घेतला. तिनं प्रशांतकुमारला गोडीगुलाबीनं हजारीबाग शहरातील शहीद निर्मल महतो पार्कजवळ बोलाविलं. त्या ठिकाणी आधीच हजर असलेल्या रौनकनं प्रशांत कुमारची गळा दाबून हत्या केली. त्याच रात्री प्रशांत कुमारचा प्लास्टिक पिशवीतील मृतदेह स्कूटीवर नेऊन छडवा डॅममध्ये फेकला. प्रशांत सिन्हा हा आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन खेळाडू होता. त्यानं २०२३ मध्ये थायलंडमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
हेही वाचा-
- भयंकर! कौटुंबिक वादातून महिलेसह तीन मुलींची निर्घृण हत्या; घटनेनंतर पती फरार - Murder in Motihari
- प्रेमविवाहाला कथित मदत करणं बेतलं जिवावर, काकानंच पुतण्याच्या अंगावर घातली फिल्मीस्टाईलनं जीप, चारवेळा चिरडून केली हत्या - Sambhajinagar Murder