चेन्नई(तामिळनाडू) Reusable Hybrid Rocket RHUMI 1 Launch : भारतानं शनिवारी तिरुविदंधाई, चेन्नई येथून पहिलं पुन: वापरता येण्याजोगं हायब्रिड रॉकेट 'RHUMI-1' लाँच केलंय. मार्टिन ग्रुपच्या सहकार्यानं तामिळनाडूस्थित स्टार्ट-अप स्पेस झोन इंडियानं हे हायब्रीड रॉकेट विकसित केलंय. मोबाईल लाँचर वापरून रॉकेट सबर्बिटल ट्रॅजेक्टोरीमध्ये सोडण्यात आलं. हे 3 घन उपग्रह आणि 50 PICO उपग्रह वाहून नेत आहे.
का आहे हे रॉकेट खास? : हा उपग्रह ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजवर संशोधनासाठी डेटा गोळा करेल. RHUMI रॉकेट पारंपरिक इंधन-आधारित हायब्रिड मोटर आणि इलेक्ट्रिकली ट्रिगर पॅराशूट डिप्लॉयरसह सुसज्ज आहे. RHUMI हे रॉकेट 100 टक्के पायरोटेक्निक-मुक्त आणि 0 टक्के TNT आहे.