नवी दिल्लीPooja Khedkar News :दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं माजी आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला : महाराष्ट्रात पूजा खेडकर यांचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. पूजा खेडकर यांची यूपीएसची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज आज न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळं दिल्ली पोलीस पूजा खेडकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. या निकालाविरोधात पूजा खेडकर उच्च न्यायालयात जाणार का? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
पूजा खेडकर यांच्यावर आरोप :पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे कोट्यवधींची संपत्ती असूनही त्यांनी ओबीसी कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, त्यांच्यावर बेकायदेशीरपणे अपंगत्वाची खोटी कागदपत्रं सादर केल्याचा आरोप आहे. त्यांची लाल बहादूर शास्त्री अकादमीकडून चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण मिळावं, यासाठी पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दिल्लीच्या पटियाला कोर्टात यावर न्यायालयानं निकाल दिला.
न्यायालयात युक्तिवाद : बुधवारी पटियाला कोर्टात झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलीस, यूपीएससी तसंच स्वतः पूजा खेडकर यांच्या वतीनं सविस्तर युक्तिवाद केला. "जिल्हाधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळं आम्हाला लक्ष्य केलं जात आहे", असा दावा पूजा खेडकर यांनी केला. त्याचवेळी पूजा खेडकर यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांनी केला. केवळ आमचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे, असं यूपीएससीकडून युक्तीवाद करत खेडकरांच्या अटकेची मागणी केली.
न्यायालयानं हे दिले आदेश : पूजा खेडकर प्रकरणाची बुधवारी सविस्तर सुनावणी झाल्यानंतर पटियाला कोर्टानं गुरुवारी संध्याकाळी या संदर्भात निर्णय दिला. त्यानुसार पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. “यूपीएससीमध्ये पूजा खेडकर यांना कोणी मदत केली का? दिल्ली पोलिसांनीही याची चौकशी करावी", असे निर्देश न्यायालयानं दिले. त्याचवेळी क्रीम लेअर सुविधेचा फायदा घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केलेल्या पूजा खेडकर यांच्याशिवाय इतर उमेदवार आहेत का? याची चौकशी यूपीएससीनं करावी, असं आदेश न्यायालयानं दिले आहेत.
हे वाचलंत का :
- पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, पटियाला हाऊस न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - Pooja Khedkar bail rejected
- पूजा खेडकरची उमेदवारी रद्द, विद्यार्थ्यांकडून कारवाईचं स्वागत - IAS Pooja Puja Khedkar
- आयएएस पूजा खेडकर प्रकरण, यूपीएससीने निर्णय घेऊन विश्वासार्हता वाढवली - अविनाश धर्माधिकारी - Avinash Dharmadhikari