ETV Bharat / bharat

हे काय... रेल्वेचं इंजिन रुळावरुन उतरलं अन् चक्क शेतात धावू लागलं; विश्वास बसत नाही ना, एकदा व्हिडिओ पाहाच - Train Engine Derailed - TRAIN ENGINE DERAILED

Train Engine Derailed : बिहारच्या गयामध्ये एक अजब दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. प्रत्यक्षात रेल्वेचं इंजिन शेतात पोहोचलं. हा अपघात कसा झाला, पहा व्हिडिओ आणि वाचा संपूर्ण बातमी.

Train Engine Derailed
रेल्वेचं इंजिन रुळावरुन उतरलं (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 7:05 AM IST

गया Train Engine Derailed : बिहारच्या गयामधून एक व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वेचं इंजिन रुळावरुन घसरुन चक्क शेताच्या दिशेनं गेल्याचं दिसून येतं. ही घटना वजीरगंज स्टेशन आणि गया किउल रेल्वे विभागाच्या कोल्हाना हॉल्ट दरम्यान रघुनाथपूर गावाजवळ घडल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडिओ (ETV Bharat)

रेल्वे इंजिन रुळावरुन घसरुन पोहोचलं शेतात : मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, इंजिन गयाच्या दिशेनं लूप लाइनमध्ये चालवलं जात होतं. याच क्रमानं रेल्वेचं इंजिन अचानक नियंत्रणाबाहेर गेलं आणि रुळ ओलांडून शेताच्या दिशेनं गेलं. यावेळी रेल्वे इंजिनासोबत एकही डब्बा नव्हता.

Train Engine Derailed
रेल्वेचं इंजिन रुळावरुन उतरलं (ETV Bharat)

गोंधळाचं वातावरण : रेल्वेचं इंजिन रेल्वे रुळावरुन खाली उतरताच परिसरातून पायी जाणाऱ्या नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. लोकांच्या म्हणण्यानुसार, इंजिनचं नियंत्रण सुटताच लोको पायलट लगेच खाली उतरला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचं मदत पथक घटनास्थळी पोहोचलं आणि इंजिन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु केले. या घटनेत रेल्वे इंजिनचं काही अंशी नुकसान झालं आहे.

"ट्रॅक बदलल्यामुळं हे घडलं. हे रेल्वे यार्डच्या शेवटच्या टोकावर बाहेर पडताना दिसतं. यामुळं कोणत्याही सामान्य नागरिकाचं नुकसान झालेलं नाही. कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाली नाही.'' - सरस्वती चंद्र, मुख्य जनसंपर्क अधिकारी, हाजीपूर.

मालगाडीचे दोन भाग : दुसरीकडे कोडरमा रेल्वे विभागातील पहारपूर रेल्वे स्थानकावर शनिवारी कपलिंग तुटल्यानं मालगाडीचे दोन भाग झाले. एक भाग काही अंतरावर गेला. लोको पायलटनं याची माहिती तात्काळ स्टेशन मास्टर आणि कंट्रोल रुमला दिली. त्याचवेळी या घटनेनंतर दोन भागात विभागलेली मालगाडी फतेहपूर स्थानकावर बराच वेळ उभी राहिली. मालगाडी कोडरमाहून गयाच्या दिशेनं जात होती. परिणामी क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा :

  1. कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस 'या' दिवशी धावणार, कोल्हापूरकरांची प्रतीक्षा संपली; चाचणी पूर्ण - Kolhapur Vande Bharat Express
  2. 'या' ट्रिक्स वापरून करा रेल्वेचं तिकीट बुक, वाचणार बक्कळ पैसे - How to Save Money on Train Tickets

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.