ETV Bharat / bharat

किश्तवाड चकमक : भारतीय सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण, छतरू परिसरात जवानांची दहशतवाद्यांशी चकमक - Kishtwar Encounter Update - KISHTWAR ENCOUNTER UPDATE

Kishtwar Encounter Update : जम्मू काश्मीरमधीव किश्तवाड जिल्ह्यातील छतरू परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे. तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

Kishtwar Encounter Update
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2024, 12:24 PM IST

श्रीनगर Kishtwar Encounter Update : भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये किश्तवाड इथं चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे. या चकमकीत आणखी दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. किश्तवाडमधील छतरु इथं सुरू असलेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलातील नायब सुभेदार विपन कुमार आणि शिपाई अरविंद सिंग यांना वीरमरण आल्याची माहिती व्हाईट नाइट कॉर्प्सच्या सोशल माध्यमातून देण्यात आली आहे. छतरु परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

किश्तवाड चकमकीत दोन जवानांना वीरमरण : जम्मू काश्मीरमधील किश्तवाड परिसरातील छतरू इथं दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली. त्यामुळे भारतीय सैन्य जलाच्या जवानांनी छतरू परिसरात दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांची चकमक उडाली. या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या नायब सुभेदार विपन कुमार आणि शिपाई अरविंद सिंग यांना वीरमरण आलं. तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी छतरू परिसरात शोधमोहीम अधिक तिव्र केली आहे.

हेही वाचा :

  1. जम्मूच्या डोडामध्ये चकमक; सैन्यदलातील कॅप्टनला वीरमरण, एका दहशतवाद्याचा खात्मा! - Encounter in Jammu Doda
  2. किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, अनंतनागमध्ये दोन जवान हुतात्मा - Anantnag encounter updates
  3. दोडा एन्काऊंटर : भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांची सलग चौथ्या दिवशी शोधमोहीम, चकमक पुन्हा सुरू - Doda Encounter

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.