महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; 20 फूट खोल खड्ड्यात वाहन पलटल्यानं 18 जणांचा मृत्यू - Road Accident in Chhattisgarh

Road Accident in Chhattisgarh : छत्तीसगडमधील कवर्धा इथं भीषण अपघात झालाय. जंगलातून परतणाऱ्या बैगा आदिवासींचं वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या या अपघातात 18 जणांचा मृत्यू झालाय.

छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; 20 फूट खोल खड्ड्यात वाहन पलटल्यानं 17 जणांचा मृत्यू झाला
छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; 20 फूट खोल खड्ड्यात वाहन पलटल्यानं 17 जणांचा मृत्यू झाला (Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 4:28 PM IST

Updated : May 20, 2024, 4:36 PM IST

कवर्धा Road Accident in Chhattisgarh : छत्तीसगडमधील कवर्धा इथं तेंदूपत्ता तोडून परतणाऱ्या 18 बैगा आदिवासींचा भीषण अपघातात मृत्यू झालाय तर यात 8 जण गंभीर जखमी झाले. हे सर्वजण जंगलातून परतत असताना वाटेत पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटून 20 फूट खड्ड्यात पलटी झालाय. या वाहनात सुमारे 25 जण होते. हे सर्व लोक सेमहरा गावचे रहिवासी होते. यातील मृतांमध्ये 17 महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

18 बैगा आदिवासींचा मृत्यू : ही घटना कवर्धाच्या कुकडूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहपनी गावाजवळ घडली. सेमहरा गावातील लोक जंगलातून तेंदूपत्ता तोडून परतत होते. परतत असताना त्यांचं पिकअप वाहन नियंत्रणाबाहेर गेलं आणि 20 फूट खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. हे सर्व बैगा आदिवासी आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ झाला. या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस पथक आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

"पीकअप वाहनात एकूण 25 लोक प्रवास करत होते. त्यापैकी 17 महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय" - अभिषेक पल्लव, एसपी, कवर्धा.

कसा घडला अपघात : जंगलातून तेंदूपत्ता तोडून परतत असलेले 25 हून अधिक बैगा आदिवासी सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास कुकडूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहपनी गावात पोहोचले. तिथं त्यांचं पिकअप वाहन नियंत्रणाबाहेर गेलं आणि 20 फूट खोल खड्ड्यात पलटी झालं. या अपघातात सुमारे 18 बैगा आदिवासींचा चिरडून जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना चांगल्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हेही वाचा :

  1. भरधाव वेगातील आलिशान कारची दुचाकीला धडक, पार्टीहून परतणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू - Pune Accident
  2. मतदान करुन परतणाऱ्या 6 प्रवाशांवर काळाचा घाला ; टिप्पर आणि खासगी बसच्या भीषण अपघातात बस पेटल्यानं होरपळून मृत्यू - Palnadu Road Accident
  3. टायर फुटल्यानंतर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली कार; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू - Hapur Road Accident
Last Updated : May 20, 2024, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details