महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'एक्झिट पोल' जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये रणनीती आखण्याकरिता हालचाली सुरू, राहुल गांधी आज घेणार बैठक - Exit Poll 2024 - EXIT POLL 2024

Congress On Exit Polls Outcomes : देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून यात भाजपाप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 125-140 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. या एक्झिट पोलनंतर काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे.

Congress On Exit Polls Outcomes
कॉंग्रेस बैठक (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 8:40 AM IST

Updated : Jun 2, 2024, 10:27 AM IST

नवी दिल्ली Congress On Exit Polls Outcomes : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी (1 जून) पार पडला. यासोबतच एक्झिट पोलचे निकालही समोर आले. एक्झिट पोलनुसार, एनडीएला 355-370 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 125-140 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तसंच इतर पक्षांना 42-52 जागा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (2 जून) दुपारी 11 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी काँग्रेस उमेदवारांसोबतच्या आभासी (ऑनलाईन) बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी दुपारी 1 वाजता देशभरातील पक्षाच्या बड्या नेत्यांशी थेट संपर्क साधू शकतात. या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, अशोक गेहलोत, सचिन पायलट यांच्यासह बड्या नेत्यांशी बोलून 4 जूनच्या मुल्यांकन आणि तयारीबाबत चर्चा केली जाणार आहे. तसंच या महत्त्वाच्या बैठकीचं 1 वाजता थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जातंय.

295 हून अधिक जागा जिंकणार-विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीची शनिवारी (1 जून) नवी दिल्लीत बैठक पार पडली. बैठकीनंतर विरोधकांनी 295 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख विरोधी पक्षनेते उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. देशात 'एक्झिट पोल'नुसार मोदींचाच दबदबा; 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का, आता लक्ष अंतिम निकाल - Lok Sabha Election EXIT POLLS
  2. भारतातील 'एक्झिट पोल'चा इतिहास काय रं भाऊ? 'एक्झिट पोल' कसा करतात? वाचा A टू Z माहिती - Lok Sabha Election 2024 Exit Polls
  3. एक्झिट पोल प्रकाशित करण्यावर बंदी; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय - Lok Sabha Elections
Last Updated : Jun 2, 2024, 10:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details