नवी दिल्ली Election Social Media Campaigning : जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेसाठी आपला देश सज्ज होत आहे. व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया यासारखे मेसेजिंग प्लॅटफॉर्म मतदारांच्या मानसशास्त्रावर प्रभाव टाकण्याचं माध्यम म्हणून उदयास आले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.
पक्ष मतदारांना कसं आकर्षित करतात?
- भाजपा : मतदारांना व्हॉट्सॲपवर पंतप्रधानांचे वैयक्तिक पत्र पाठवून त्यांच्याशी जोडण्याचा भाजपाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. व्हॉट्सॲपचे भारतात महिन्याला 500 दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. भाजपानं पत्रातून नरेंद्र मोदी सरकारच्या यशावर प्रकाश टाकला. तसेच मतदारांकडून अभिप्राय मागविले आहेत. तसंच पक्षानं 'माय फर्स्ट व्होट फॉर मोदी' ही वेबसाइट सुरू केली. ही वेबसाईट अभ्यागतांना मोदींना मतदान करण्याचं वचन देण्याची आणि त्यांच्या निवडीमागील कारण सांगणारा व्हिडिओ सबमिट करण्यास अनुमती देते. वेबसाइटवर एनडीए सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांवर प्रकाश टाकणारे अनेक छोटे व्हिडिओदेखील आहेत.
- काँग्रेस : दुसरीकडे, काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे व्हॉट्सॲप चॅनेल चालविले जातात. व्हॉट्सॲपमधून माहितीच्या प्रसारावर जिल्हा स्तरावर लक्ष ठेवलं जातं. जेणेकरुन माहिती जनतेपर्यंत पोहोचेल. त्यामधून पक्षाला मिळणार समर्थन वाढेल.