आग्रा Taj Mahal Free Entry: बकरी ईद निमित्त प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहालमध्ये आज तीन तास विनामूल्य प्रवेश देण्यात आला. मात्र, मुख्य घुमट आणि समाधी पाहण्याकरिता पर्यटकांना 200 रुपयांच टिकीट काढावं लागलं. अनेक स्थानिकांनी आणि पर्यटकांनी विनामूल्य प्रवेश घेत पर्यटनाचा आनंद लुटला. यासोबतच 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त देशभरातील सर्व स्मारकांमध्ये प्रवेश विनामूल्य असेल. परंतु या दिवशी शुक्रवार असल्यानं ताजमहाल बंद असणार आहे. त्यामुळे यामुळे पर्यटकांना विनामुल्य प्रवेशाचा आनंद घेता येणार नाही. परंतु पर्यटकांना आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्रीसह सर्व स्मारकांमध्ये विनामुल्य प्रवेशाचा आनंद लुटता येईल.
प्रवेश विनामुल्य अल्यामुळे लाखो पर्यटकांनी घेतला आनंद: यासंबंधीत माहिती देताना डॉ. राजकुमार पटेल म्हणाले की, "बकरी ईदला ताजगंज येथील स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी ताजमहालाच्या रॉयल मशिदीत ईद निमित्तानं नमाज पठण केलं. सोमवारी, ताजमहालमध्ये देशी-विदेशी पर्यटकांना तीन तास (सकाळी 7 ते 10) प्रवेश विनामूल्य देण्यात आला होता. संबंधीत माहिती दोन दिवसापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे सकाळी मोठ्या संख्येन पर्यटक ताजमहाल येथे पोहोचले."
उष्णतेमुळे पर्यटकांच्या संख्येत घट:आग्रा किल्ल्यासह ताजमहाल आणि इतर पर्यटन स्थळ पाहण्यासाठी हजारो देशी आणि विदेशी पर्यटक दररोज येतात. मात्र, उष्णतेमुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. ताजमहालला भेट देण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांना 50 रुपयांचे प्रवेश तिकीट खरेदी करावं लागतं. विदेशी पर्यटकांना ताजमहाल पाहण्यासाठी 1150 मोजवे लागतात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) डिसेंबर 2018 पासून ताजमहालातील मुख्य घुमट आणि समाधीचं दर्शन घेण्यासाठी 200 रुपयांचं अतिरिक्त तिकीट लागू करण्यात आलं आहे.