छतरपूरpumpkin Removed from stomach :मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून 1 फुटाहून अधिक लांबीचा भोपळा बाहेर काढलाय. या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
डॉक्टरांनी तरुणावर शस्त्रक्रिया केली आहे. या तरुणाच्या पोटातून भोपळ्याशिवाय एक देठही निघाला आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील खजुराहो भागातील आहे. सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोटदुखीची तक्रार घेऊन हा तरुण डॉक्टरकडं आला होता. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्स-रे केल्यानंतर त्यांना काहीतरी विचित्र दिसलं. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. तरुणावर शस्त्रक्रिया केली असता त्याच्या पोटातून मोठा भोपळा बाहेर आला. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं.
पोटात दिसली विचित्र गोष्ट : डॉक्टर नंद किशोर जाटव यांनी सांगितलं की, "एक व्यक्ती पोटदुखीची तक्रार घेऊन आला होता. त्यानंतर आम्ही त्याच्या पोटाचा एक्स-रे केला. त्यावेळी त्याच्या पोटात काहीतरी लांबलचक वस्तू दिसत होती. त्यानंतर टीमनं ऑपरेशनचा सल्ला दिला. या तरुणाचं ऑपरेशन ऑपरेशन करण्यात आलं. रुग्णाच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यानं ऑपरेशनसाठी एक टीम तयार करण्यात आली. ऑपरेशन करून त्याच्या पोटातून सर्व वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत."
गुदद्वारातून भोपळा टाकला आत : डॉक्टर नंदकिशोर जाटव यांनी सांगितलं की, "पीडित व्यक्तीनं त्याच्या गुदद्वारातून भोपळा टाकला होता. त्यामुळं त्यांच्या अनेकांच्या नसाही फाटल्या होत्या. रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. अथक परिश्रमानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. रुग्णाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतर खरे कारण कळणार आहे. त्यानं स्वत: भोपळा पोटात का टाकला? की अन्य कोणी त्याच्यावर बळजबरी केली होती, हे कळणार आहे.