महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अरविंद केजरीवालांना दिल्ली न्यायालयाचा मोठा झटका; अटकेविरोधातली याचिका फेटाळली - Verdict On Arvind Kejriwal Bail - VERDICT ON ARVIND KEJRIWAL BAIL

Verdict On Arvind Kejriwal Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं दिल्ली दारू घोटाळ्यात अटक केली होती. अरविंद केजरीवाल यांनी अटकेला विरोध करत उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयानं फेटाळली आहे.

Verdict On Arvind Kejriwal Bail
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 1:59 PM IST

Updated : Apr 9, 2024, 4:36 PM IST

नवी दिल्ली Verdict On Arvind Kejriwal Bail : दिल्ली दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा या दुपारी अडीच वाजता निकाल सुनावणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी 23 मार्चला अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यावर 3 एप्रिलला सुनावणी घेत न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता.

दिल्ली न्यायालयानं फेटाळली होती याचिका :दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांना तिहार कारागृहात पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी एक एप्रिलला राऊज एव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली होती. मात्र राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळल्यानं अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. तेव्हापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या वतीनं त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

आतापर्यंत काय घडल्या आहेत घडामोडी :दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यांनी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 21 मार्चला दाखल करण्यात आलेली याचिका दुसऱ्यात दिवशी अरविंद केजरीवाल यांच्यावतीनं मागं घेतली. अंमलबजावणी संचालनालयानं लगेच 22 मार्चला अरविंद केजरीवाल यांना राऊज अव्हेन्यू न्यायालयात हजर केलं. त्यानंतर झालेल्या सुनावणीत 28 मार्चला न्यायालयानं ईडी कोठडी ठोठावली. त्यानंतर पुन्हा राऊज एव्हेन्यू न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांची कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार कारागृहात पाठवण्यात आलं. अरविंद केजरीवाल यांच्यावतीनं अटकेविरोधात 23 मार्चला दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं 27 मार्चला ईडीला नोटीस बाजावून 2 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर 3 एप्रिलला झालेल्या सुनावणीचा निकाल उच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. त्यावर आज दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे.

काय आहे दिल्ली दारू घोटाळा प्रकरण :दिल्ली सरकारमध्ये दारू घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीनं करण्यात आला. तपासानंतर ईडीनं दिल्लीत दारू घोटाळा झाल्याचं मान्य केलं. दिल्ली दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंह यांच्यासह तेलंगाणाच्या बिआरएस नेत्या के कविता यांना अटक केली. त्यानंतर ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तब्बल 9 समन्स पाठवले. मात्र त्यांनी या समन्सला केराची टोपली दाखवली. अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या विरोधात जात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावल्यानं ईडीनं 21 मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक केली.

हेही वाचा :

  1. अरविंद केजरीवालांच्या आणखी एका मंत्र्याला नोटीस; भाजपानं केली होती निवडणूक आयोगाकडं तक्रार - Election Commission Notice to AAP
  2. तुरुंगातून बाहेर पडताच संजय 'सिंह' यांची गर्जना, 'आप'चा संघर्ष करण्याचा निर्धार - MP Sanjay Singh granted bail
  3. सुनेत्रा पवार, सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन; लोकसभा निवडणुकीत या तीन महिला गाजवत आहेत मैदान - Lok Sabha Election
Last Updated : Apr 9, 2024, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details