नवी दिल्ली Arvind Kejriwal Arrest By CBI : दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणात सीबीआय अॅक्शन मोडवर आली आहे. सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांची कारागृहात चौकशी केली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आज राऊज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सीबीआयनं त्यांना तिहार तुरुंगात नेलं आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्यात मनी लाँड्रींग प्रकरणी मंगळवारी त्यांची चौकशी करण्यात आली. सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांचा जबाब नोंदवला. मात्र यात अरंविद केजरीवाल यांच्या उत्तरात तफावत आढळल्यानं सीबीआय अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना आज सकाळी अटक केली.
अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक :दिल्ली दारू घोटाळ्यात मनी लाँड्रींग केल्याचा आरोप करत ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यानंतर आता सीबीआयही अॅक्शन मोडवर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, तपास यंत्रणेनं अरविंद केजरीवाल यांची केवळ चौकशी केली. त्यानंतर सीबीआय अधिकारी तिहारहून परत आल्याचं नंतर उघड झालं. सीबीआय आणि ईडीनं ऑगस्ट 2022 मध्ये दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील कथित अनियमिततेबद्दल गुन्हे दाखल केले. दारू धोरण प्रकरणी ईडीनं 21 मार्चला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक केली. 1 एप्रिल रोजी त्यांना तिहार कारागृहात पाठवण्यात आलं. आता आज सकाळी सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली.