महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लडाख ते राजघाट पदयात्रा रोखली; सोनम वांगचूक यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Sonam Wangchuk Detained By Police - SONAM WANGCHUK DETAINED BY POLICE

Sonam Wangchuk Detained By Police : सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर लडाखला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केली. या मागणीसाठी लडाख ते राजघाट अशी पदयात्रा सोनम वांगचुक यांनी काढली. मात्र पोलिसांनी दिल्लीजवळील सिंघू सीमेवर त्यांना रोखत ताब्यात घेतलं.

Sonam Wangchuk Detained By Police
सोनम वांगचूक (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 1:21 PM IST

नवी दिल्ली Sonam Wangchuk Detained By Police : पर्यावरणसाठी कार्य करणारे सुप्रसिद्ध कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी लढाख ते राजघाट अशी पदयात्रा काढली. लडाखबाबत विविध मागण्या घेऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांनी ही पदयात्रा काढली. मात्र सोनम वांगचुक यांना सिंघू सीमेवर ताब्यात घेण्यात आलं आहे. सोनम वांगचुक हे त्यांच्या 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह राजघाटाकडं पदयात्रा करत निघाले होते. सोनम वांगचुक यांनी लढाखला विशेष दर्जा देण्याची मागणी केली आहे. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरुन सरकारवर मोठा हल्लाबोल केला.

सोनम वांगचूक (ETV Bharat Reporter)

सोनम वांगचूक यांची लढाख ते राजघाट पदयात्रा :सोनम वांगचुक यांनी लढाख ते राजघाट अशी पदयात्रा काढली आहे. सोनम वांगचुक यांनी लढाखला पुन्हा विशेष दर्जा देण्याची मागणी केली. त्यासाठी सोनम वांगचुक यांनी लडाख ते राजघाट अशी पदयात्रा आयोजित केली. मात्र सोनम वांगचुक यांची ही पदयात्रा सिंघू सीमेवर अडवण्यात आली आहे. सोमवारी रात्री दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवर प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह आलेल्या त्यांच्या समर्थकांनाही ताब्यात घेण्यात आलं.

लडाखला विशेष संरक्षण आणि स्वायत्तता द्या :भारतीय संविधानाच्या 6 व्या अनुसूचीनुसार काही राज्यांना विशेष संरक्षण आणि स्वायत्तता प्रदान करते. यानुसार त्या राज्यातील संस्कृतीचं रक्षण करण्यात येते. जम्मू कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरचं विभाजन करण्यात आलं. यानंतर लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. मात्र सोनम वांगचूक यांनी लडाखमधील पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी केली. लडाखला घटनेच्या 6 व्या अनुसूची अंतर्गत आणलं जाऊन विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केली.

एक सप्टेंबरला काढली पदयात्रा :सोनम वांगचुक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी लेहमधील हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख (HIAL) कॅम्पसमध्ये 26 ते 30 जानेवारी दरम्यान पाच दिवसाचं उपोषण केलं. त्यानंतर त्यांनी 31 जानेवारीला लेहमधील पोलो ग्राऊंडवर जाहीर रॅलीनं या आंदोलनाचा समारोप केला. यावेळी सोनम वांगचुक यांनी त्यांच्या भाषणात लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी करुन लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. सोनम वांगचुक यांनी 1 सप्टेंबरला दिल्लीतील राजघाटाकडं कूच केली. मात्र त्यांना सिंघू सीमेवर ताब्यात घेण्यात आलं.

हेही वाचा :

  1. "मोदीजी! तुमचा अहंकारही मोडेल...", सोनम वांगचुकच्या अटकेवरुन राहुल गांधी संतापले - Police Detain Sonam Wangchuk
  2. EXCLUSIVE : 'बॉयकॉट मेड इन चायना' मोहीमेबाबत सोनम वांगचुक यांची विशेष मुलाखत..
  3. Sonam Wangchuk Twitter : लडाखमध्ये सर्व काही ठीक नाही... सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोनम वांगचुक बसणार उपोषणाला

ABOUT THE AUTHOR

...view details