वाराणसीCOVID Vaccine Side Effects - कोरोना लशीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर देशात प्रथमच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यानं वाराणसी न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीरम इन्स्टिट्यूट कंपनी, सीरमचे सीईओ अदार पुनावाला, कोरोना लस कंपनीसह कंपनीच्या चेअरमन अशा 28 जणांविरोधात याचिका दाखल केली. या प्रकरणाची 23 मे रोजी सुनावणी होणार आहे.
वाराणसीमधील युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा वकील विकास सिंह यांनी वकील गोपाल कृष्ण मार्फत यांच्यामार्फत न्यायालयात मानव अधिकार अधिनियम १९९३ अंतर्गत वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी याचिकेत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीरम कंपनी, सीरम कंपनीचे चेअरमन, अॅस्ट्राझेनेका कंपनीसह चेअरमन यांच्यासह २८ जणांनी संगनमत केले. त्यांनी कोणतंही परीक्षण न करता कोव्हिशील्ड लस तयार केली. लोकांना भीती घालून बळजबरीनं लस दिली. त्यामधून त्यांनी लाभ मिळविला.
दुष्परिणाम झालेल्या लोकांना नुकसान भरपाई द्यावी- लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाभ मिळाला. मोदींना सीरमकडून देणगी मिळाली. लसीचे दुष्परिणाम माहित असतानाही त्यांनी लोकांना मृत्यूच्या दरीत ढकलले. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता न्यायहित आणि जनहित लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी सहित 28 जणांना दंड ठोठावा. ज्या लोकांवर कोरोना लशींचे दुष्परिणाम झाले आहेत, अशा लोकांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी याचिकाकर्त्यानं विनंती केली आहे.