चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी लोहयुगाची सुरुवात तामिळ भूमीपासून झाल्याचा दावा केलाय. तसंच तामिळनाडूमध्ये झालेल्या उत्खननातून मिळालेल्या अलीकडच्या कालगणनेनुसार, इ.स. पूर्व 4000 च्या सुरुवातीच्या काळात लोखंड प्रचलित झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
बुधवारी (24 जाने.) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्टूरपुरम, चेन्नई येथील अण्णा शताब्दी वाचनालयात पुरातत्व विभागाच्या वतीनं ‘लोहाची पुरातनता’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यादरम्यान स्टॅलिन यांनी कीझाडी ओपन एअर म्युझियम आणि गंगाईकोंडा चोलापुरम म्युझियमची पायाभरणी केली आणि कीझाडी वेबसाइटही लॉन्च केली.
लोहयुगाची सुरुवात तामिळनाडूतून झाली :यावेळी बोलताना मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, "लोहयुगाची सुरुवात तामिळ भूमीतून झाली, ही महान मानववंशशास्त्रीय संशोधन घोषणा मी केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी करत आहे. तामिळनाडूमध्ये उत्खननातून मिळालेल्या अलीकडच्या कालक्रमानुसार लोखंडाचा परिचय इसवी सन पूर्व 4000 च्या पूर्वार्धात केला गेलाय, असं म्हणता येईल. दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडूमध्ये सुमारे 5300 वर्षांपूर्वी लोखंड आलं असावं याची खात्री आहे." तसंच तामिळनाडू सरकारच्या पुरातत्व विभागानं केलेल्या उत्खननादरम्यान गोळा केलेले नमुने जगातील सर्वोत्तम प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
लोहयुग कधी सुरू झालं? :"हे नमुने ओएसएल विश्लेषणासाठी राष्ट्रीय संस्थांकडं आणि रेडिओकार्बन डेटिंगसाठी बीटा प्रयोगशाळेकडं पाठवण्यात आले होते. तिन्ही संस्थांकडून समान विश्लेषणात्मक परिणाम प्राप्त झाले. तामिळनाडू सरकारच्या पुरातत्व विभागानं हे नमुने विविध संशोधन संस्थांना पाठवले आणि मिळालेल्या निकालांची तुलना करून समान परिणाम प्राप्त केले. सध्या उपलब्ध असलेल्या रेडिओकार्बन तारखा आणि ओएसएल विश्लेषण तारखांच्या आधारे, ते दावा करतात की दक्षिण भारतात 3500 इ.स पूर्व लोखंड आले," असं त्यांनी सांगितलं.
पुढं ते म्हणाले, "नुकत्याच झालेल्या उत्खननाच्या निष्कर्षांवरून आपण अभिमानानं सांगू शकतो की, लोहखनिजापासून लोह काढण्याचे तंत्रज्ञान केवळ तामिळनाडूतच नव्हे तर तामिळ भूमीत विकसित झाले आहे. म्हणजेच 5300 वर्षांपूर्वी तामिळ भूमीत लोखंडाचा वापर करण्यात आला होता. हे आपण वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केलंय. हे जगाला जाहीर करताना मला आनंद होतोय." तसंच ही बाबा तामिळनाडूसाठी अभिमानास्पद असल्याचंही ते म्हणाले.
भारताचा इतिहास तामिळनाडूतूनच लिहिला जावा :मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, "भारताचा इतिहास तामिळनाडूतूनच लिहिला जावा, असं मी म्हणत आलोय. हे सिद्ध करण्यासाठी तामिळनाडू पुरातत्व विभाग सातत्यानं अभ्यास करतंय. या अभ्यासातून अनेक आश्चर्यकारक बाबी उघड होत आहेत. कीळझाडीच्या उत्खननानं हे उघड झालं. असं मानलं जातं की तामिळनाडूमध्ये शहरी सभ्यता आणि साक्षरता इसवी सनपूर्व 6 व्या शतकात सुरू झाली आणि पोरुनई नदीच्या काठावर 3200 वर्षांपूर्वी भातशेती सुरू झाली. मी तामिळनाडू विधानसभेच्या माध्यमातून कृष्णागिरी जिल्ह्यातील मायलादुमपराई येथे उत्खननाद्वारे जगाला जाहीर केलं की, तामिळनाडूमध्ये लोखंडनिर्मिती 4200 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. अशा उत्खननाचे परिणाम केवळ तामिळनाडूच्या इतिहासासाठीच नव्हे, तर भारताच्या इतिहासासाठी महत्त्वपूर्ण आहेत."
हेही वाचा -
- ईनाडू 50 वा वर्धापन दिन: ईटीव्ही समूहाकडून तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना सुवर्ण महोत्सवी पुस्तिका भेट
- MK Stalin Interview : 'हिंदीला विरोध नाही, पण जर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत
- Tamil Nadu CM accuses BJP: बिहारी मजूर मारहाण प्रकरण, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला भाजपचा समाचार, म्हणाले, 'अफवा पसरवताहेत'