महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा मारणार पलटी, ममता म्हणाल्या त्यांच्या जाण्यानं काही

Mamata Banerjee On Nitish Kumar इंडिया आघाडीत महत्वाचे नेते मानले जाणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार असल्याच्या जोरदार बातम्या येत आहेत. त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विचारलं असता, "नितीश कुमार यांच्या जाण्यानं इंडिया आघाडीला फारसा परिणाम पडणार नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Bihar Chief Minister Nitish Kumar
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 9:02 AM IST

कोलकाताMamata Banerjee On Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडून पुन्हा भाजपामध्ये सामील होत असल्याची बातमी समोर आल्यानंतर आता 'इंडिया' आघाडीच कसं होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नितीश कुमार यांच्या बाहेर पडण्यामुळं 'इंडिया' आघीडीवर कोणताही परिणाम होणार नाही, म्हणत नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. त्या शुक्रवार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. दरम्यान, "मला वाटते की, बिहारच्या लोकांच्या नजरेत नितीश कुमार यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये सुरळीतपणे काम करणं सोपं होईल," असंही ममता म्हणाल्यात.

तर आंदोलन करणार :काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये कुणाशीही आघाडी न करत आपण एकटं लढणार असल्याची घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक एकट्यानं लढवेल. मात्र, हे पक्ष एकत्र राहतील. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच भविष्यातील सर्व निर्णय घेतले जातील, असंही त्या म्हणाल्या होत्या. याचवेळी केंद्र सरकार आपल्या राज्याला निधी देत नाही, असा आरोप करत ममता यांनी केंद्र सरकावर जोरदार हमला केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "येत्या सात दिवसात केंद्राचा निधी न दिल्यास आंदोलन केलं जाईल." राज्य सरकारनं केंद्र सरकारला विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्यानंतरही केंद्राचा निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यातील वाटचाल काय असेल ते लवकरच ठरवल जाईल, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

भांडण चव्हाट्यावर : पंतप्रधान मोदींविरोधात देशभरातील भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करणारे आणि 'इंडिया' आघाडीचे शिल्पकार असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएकडं झुकताना दिसतायेत. नितीश कुमार यांच्यावर दबावाचं राजकारण केल्याचा आरोप आहे. यावेळी नितीश यांच्या राजकारणानं आणखी एक पातळी ओलांडली. दबावाच्या राजकारणाद्वारे आपली मागणी पूर्ण करवून घेण्यात नितीश कुमार माहिर आहेत. सध्या बिहारमधील राजकीय गदारोळामुळे, त्यांना जे साध्य करायचं होतं ते साध्य झाल्याचं दिसतंय. अशा स्थितीत, महाआघाडीतील दोन प्रमुख पक्ष आरजेडी आणि जेडीयूमधील भांडणंही चव्हाट्यावर आलीत. जदयू नेते मनोज झा यांनी नितीश कुमारांकडं स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

येथून राजकीय वातावरण बदललं :कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त नितीश कुमार यांनी कुटुंबवादाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर एनडीएच्या अनेक नेत्यांनी हा मुद्दा जोरात मांडण्यास सुरुवात केली. घराणेशाहीबाबत भाजपा, लालू प्रसाद यादव, काँग्रेस तसेच सपाला सतत टोलावत असतो. बिहार विधानसभेची सद्यस्थिती : 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. मात्र 7 ऑगस्ट 2022 रोजी नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत सरकार स्थापन केलं. महाआघाडीला 160 आमदारांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही. यावेळी नितीश कुमार यांनी पुन्हा पक्ष बदलून एनडीएसोबत सरकार स्थापन केलं तरी बहुमताचा आकडा फार वाढणार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details