महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची कारवाई, बल्लारी मध्यवर्ती कारागृहातून संशयित दहशतवाद्याला घेतलं ताब्यात - Bengaluru Cafe Blast

Bengaluru Cafe Blast : बंगळुरु येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेत 1 मार्चला दुपारच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एनआयएनं बल्लारी मध्यवर्ती कारागृहातून संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलंय.

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएनं बल्लारी मध्यवर्ती कारागृहातून संशयित दहशतवाद्याला घेतलं ताब्यात
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएनं बल्लारी मध्यवर्ती कारागृहातून संशयित दहशतवाद्याला घेतलं ताब्यात

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 11:22 AM IST

बंगळुरु Bengaluru Cafe Blast : रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आलंय. बल्लारी मध्यवर्ती कारागृहात असलेल्या मिनाज उर्फ सुलेमानला एनआयए अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी सुरू केलीय.

आतापर्यंत कोणाला घेतलं ताब्यात : एनआयएनं यापूर्वी बंदी घातलेल्या पीएफआय संघटनेचा सदस्य मिनाज, कौन बाजार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बल्लारी येथील रहिवासी आणि सय्यद समीर नावाच्या त्याच्या गटातील आणखी एक सदस्याला राज्यात तोडफोडीच्या कृत्यांचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर मिनाजला बल्लारी मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलंय. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात मिनाजच्या सहभागाबाबत महत्त्वाचे संकेत समोर आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

6 मार्चला मिनाजला घेतलं ताब्यात : इसीसच्या अतिरेक्यांच्या संपर्कात असलेला मिनाज कर्नाटकात तोडफोडीचा कट रचत होता. त्यामुळं तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केलं. 18 डिसेंबर 2023 रोजी, मिनाजला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात एकाच वेळी कारवाई केली होती. त्यानंतर त्याला बल्लारी मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयए अधिकाऱ्यांनी एका महत्त्वाच्या माहितीच्या आधारे 6 मार्च रोजी संशयित दहशतवादी मिनाजला ताब्यात घेतलं होतं. त्याला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं.

1 मार्चला झाला स्फोट : बंगळुरु येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेत 1 मार्चला दुपारच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेत चारजण गंभीर जखमी झाले होते. एका पिशवीत ठेवलेल्या वस्तूचा स्फोट झाला होता. हे ठिकाण बंगळूरमधील सर्वात प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे.

हेही वाचा :

  1. रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, चारजण जखमी, सुदैवानं जीवितहानीचं वृत्त नाही
  2. गलिच्छ कपडे परिधान केल्याबद्दल शेतकऱ्याला बंगळुरू मेट्रोत नाकारला प्रवेश, प्रशासनानं कर्मचाऱ्यावर केली कारवाई
  3. बेंगळुरूतल्या 15 शाळांना बॉम्बनं उडविण्याची धमकी; कर्नाटकात खळबळ, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी शाळेत जाऊन घेतला आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details