महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महिला बँक मॅनेजरला भामट्यानं केलं डिजिटल अटक; 17 लाखाला घातला गंडा - Bank Manager Digital Arrest - BANK MANAGER DIGITAL ARREST

Bank Manager Digital Arrest : महिला बँक मॅनेजरला डिजिटल अटक करुन सायबर भामट्यांनी 17 लाख रुपयाचा गंडा घातल्यानं मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे या भामट्यांनी महिलेला त्यांच्या नावावर मुंबईत सिम कार्ड असून त्यावरुन बेकायदेशीर कामं होत असल्याची थाप मारली.

Bank Manager Digital Arrest
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 2:02 PM IST

जयपूर Bank Manager Digital Arrest : महिला बँक मॅनेजरला पाच तास व्हिडिओ कॉल करुन डिजिटल अटक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या महिला बँक मॅनेजरची तब्बल 17 लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्यानं मोठी खळबळ उडाली. कॉल करणाऱ्या भामट्यानं महिला बँक मॅनेजरला त्यांच्या नावानं जारी केलेलं सिम आणि आधार कार्ड वापरुन बेकायदेशीर कामं करत असल्याचं सांगून धमकावलं. यावेळी मुंबई पोलीस दलातील अधिकारी बोलतो असं सांगून आणखी एका गुन्हेगारानं महिला बँक मॅनेजरला व्हिडिओ कॉलवर बोलून 20 लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी जयपूर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महिलेचं आधार कार्ड वापरुन सिम बनवल्याची मारली थाप :"पीडित महिला बँक मॅनेजरनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 जूनला सकाळी महिला बँक मॅनेजरला मोबाईलवर एक कॉल आला होता. यावेळी कॉलरनं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा प्रतिनिधी बोलत असल्याची थाप मारली. महिलेचं आधार कार्ड वापरुन महाराष्ट्रात जारी केलेलं सिम बेकायदेशीर कामांसाठी वापरलं जात असल्याचं त्यानं या महिला बँक मॅनेजरला सांगितलं. मात्र पीडितेनं असं कोणतंही सिम कार्ड नसल्याचं स्पष्ट केलं, तेव्हा तिला कॉलरनं मुंबई पोलिस अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगून कॉल डिस्कनेक्ट केला," अशी माहिती सायबर क्राइम पोलीस स्टेशनचे अधिकारी चंद्रप्रकाश यांनी दिली.

महिला बँक मॅनेजरला घातला गंडा :महिला बँक मॅनेजरच्या फोनवर एक कॉल आला. यावेळी कॉल करणाऱ्यानं आपलं नाव विनय खन्ना असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यानं हा फोन कट केला आणि लगेच दुसऱ्या क्रमांकावरुन फोन आला. त्यानंतर पुन्हा एका नंबरवरुन कॉल आला. यावेळी महिला बँक मॅनेजरला स्काईप सॉफ्टवेयर इंस्टॉल करायला सांगण्यात आलं. महिला बँक मॅनेजरनं नवीन सॉफ्टवेयर इंस्टॉल केल्यानंतर त्यांना पुन्हा व्हिडिओ कॉल करण्यात आला. यावेळी कॉल करणाऱ्यानं महिला बँक मॅनेजरनं रिजर्व बँक व्हेरिफिकेशनच्या नावावर 20 लाख रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर करुन घेतल्याचा आरोप पीडितेनं केला.

पैशे परत करण्याची मारली थाप :महिला बँक मॅनेजरला गंडा घालणाऱ्या भामट्यांनी पीडितेची एफडी तोडण्यास भाग पाडून 17 लाख रुपये त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वळते करुन घेतले. या सायबर भामट्यांनी व्हेरिफिकेशन करुन 6 ते 8 तासात पैसे परत करण्याची थाप या महिला बँक मॅनेजरला दिली होती. मात्र महिलेला पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली.

हेही वाचा :

  1. पीएमओ कार्यालयात सल्लागार असल्याचं सांगून 50 लाखाची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Pune Fraud News
  2. अजबच! ओटीपी शेअर न करूनही सायबर गुन्हेगारांनी फिल्म प्रोड्यूसरला घातला लाखोंचा गंडा - Financial Fraud Mumbai
  3. चित्रकाराने महिलेला घातला 1 कोटींचा गंडा; शेअर बाजारात दुप्पट नफा मिळवून देण्याचं दाखवलं आमिष - Mumbai Cyber Fraud

ABOUT THE AUTHOR

...view details