नवी दिल्ली Arvind Kejriwal resigns : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लेफ्टनंट नायब राज्यपाल व्ही के राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आतिशी आणि आम आदमी पार्टीचे (आप) ज्येष्ठ नेतेही यावेळी उपस्थित होते. केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला, तर आतिशी यांनी नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
तासभर चालली आप नेत्यांची बैठक :दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक झाली. या बैठकीत सगळे आमदार तसंच विद्यमान कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर सौरभ भारद्वाज यांनी माध्यमांना बैठकीची माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांबाबत बैठकीत उपस्थित प्रत्येक नेत्याशी चर्चा केली. आपच्या नेत्यांची त्यांनी यावेळी मतं आजमावली. यावेळी दिल्लीसह इतर राज्यांमध्ये आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या परिस्थितीचा आढावाही घेण्यात आला.