नवी दिल्लीAAP MLAs horse trading Case :अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भाजपा 'आप'च्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा त्यांचे 21 आमदार फोडण्याची योजना आखात असल्याचा आरोप केजरीवाला यांनी केलाय. यासंदर्भात त्यांच्या सात आमदारांशीही संपर्क साधण्यात आला होता, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचं प्रकरणात क्राइम ब्रँचचं अधिकारी केजरीवालांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.
भाजपाकडून आमदार फोडीचे प्रयत्न : दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला, की भाजपा आम आदमी पार्टीच्या आमदारांना 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे. त्यांचे सात आमदार फोडण्याचा प्रयत्न झालाय. योग्य वेळ आल्यावर ऑडिओ क्लिप रिलीज करू, असं आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. या प्रकरणी दिल्ली पोलीस क्राइम ब्रँच आतिशी यांना नोटीसही पाठवू शकतात, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
आम आदमी पार्टीच्या आरोपांवर भाजपाचा पलटवार : दिल्ली भाजपानं केजरीवालांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम आदमी पक्षाला भाजपानं कथितपणे संपर्क केलेल्या आमदारांची नावे उघड करण्यास सांगितलं आहे. दिल्ली भाजपाचे सचिव हरीश खुराना यांनी आतिशी यांना भाजपानं संपर्क केलेल्या आमदारांची नावं उघड करण्याचं आव्हान दिलं आहे. भाजपाचे म्हणणं आहे की, 'आप' पक्ष, असे बेताल आरोप करून खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे.