महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, अनंतनागमध्ये दोन जवान हुतात्मा - Anantnag encounter updates

Jammu Kashmir Security Force Search Operation : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील घनदाट जंगलात रविवारी (11 ऑगस्ट) पहाटे भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीनंतर दुसऱ्या दिवशी ही चकमक झाली. सध्या सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

kokernag in anantnag kishtwar jammu kashmir security forces search operation terrorist
किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 5:43 PM IST

श्रीनगर Jammu Kashmir Security Force Search Operation : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. चकमकीत दोन जवानांना वीरमरण आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या अहलान गाडुलमध्ये सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. शनिवारी येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.

राजनाथ सिंह काय म्हणाले? : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त केला. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणाले की, "अनंतनागमधील कोकरनाग येथे दहशतवादविरोधी कारवाईत आपल्या शूर आणि नीडर भारतीय जवानांच्या हौतात्म्यानं खूप दुःख झालंय. या दुःखाच्या प्रसंगी देश शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे."

सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जवानांच्या बलिदानाला सलाम केलाय. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "जम्मूच्या अनंतनागमध्ये कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणारे शूर हवालदार दीपक कुमार यादव आणि लेफ्टनंट कमांडर प्रवीण शर्मा यांच्या सर्वोच्च बलिदानाला भारतीय सैन्याच्या सर्व श्रेणीतील जवानांकडून सलाम. या दुःखाच्या प्रसंगी भारतीय सैन्य शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे."

सर्च ऑपरेशन सुरू :राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दक्षिण काश्मीरमधील किश्तवार रेंजमधील कपरान गारोल भागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या गुप्तचर वृत्तानंतर कारवाई सुरू केलीय. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 9 आणि 10 ऑगस्टच्या रात्री सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये डोडा भागात हल्ले करणारे दहशतवादी लक्ष्य आहेत. श्रीनगरमधील सैन्याच्या निवेदनात म्हटलंय की, 24 जुलै रोजी डोडा भागातील अत्याचार आणि घटनांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांनी किश्तवार रेंज ओलांडून दक्षिण काश्मीरमधील गारोल परिसरात प्रवेश केला. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या दहशतवाद्यांवर सतत नजर ठेवली. 9 आणि 10 ऑगस्टच्या रात्री कपरानच्या पूर्वेकडील पर्वतांमध्ये दहशतवाद्यांना पकडण्याकरिता सर्व ऑपरेशन सुरू करण्यात आलं. यावेळी झालेल्या चकमकीत दोन जवान आणि जवळपासचे दोन नागरिक जखमी झाले.

कोकरनाग चकमकीत 3-4 दहशतवादी सामील :जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज सांगितलं की, काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग जंगलात दहशतवाद्यांविरोधी कारवाई सुरू आहे. यासंदर्भात अधिक माहिती देत काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विधि कुमार बिरधी म्हणाले की, "कोकरनाग जंगलातील अहलान, गडोल भागात दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या कारवाईत दोन जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर एका जवानावर उपचार सुरू आहेत. त्या जवानाची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक माहितीवरून असं दिसून येतं की घेरलेल्या भागात 3-4 दहशतवाद्यांचा एक गट असावा", असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय.

हेही वाचा -

  1. जम्मू काश्मीरमध्ये वाढला दहशतवाद ; जाणून घ्या कसा करता येईल सामना ? - Terrorism In Jammu and Kashmir
  2. कठुआमध्ये सैनिकांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, चार जवानांना वीरमरण - Terror Attack On Indian Army
  3. दक्षिण कोरिया जॉब रॅकेट प्रकरणात टेरर अँगलची शक्यता, नौदलातील अधिकारी शर्मा आणि आरोपी डागरा जम्मू काश्मीरमधील शाळेतले वर्गमित्र - South Korea job racket

ABOUT THE AUTHOR

...view details