महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amit Shah on CAA : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान, म्हणाले... - Amit Shah on CAA challenges

Amit Shah on CAA : गृहमंत्री अमित शाह यांनी CAA च्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलंय. त्यांनी उद्धव ठाकरेंनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असं थेट आव्हान केलंय.

Amit Shah on CAA: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन अमित शहांचं उद्धव ठाकरेंना थेट आवाहन, म्हणाले...
Amit Shah on CAA: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन अमित शहांचं उद्धव ठाकरेंना थेट आवाहन, म्हणाले...

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 2:31 PM IST

हैदराबाद Amit Shah on CAA : गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) च्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना धारेवर धरलंय. अमित शाह म्हणाले, "माझी उद्धवजींना विनंती आहे की, त्यांनी आधी या कायद्याची (CAA) गरज आहे की नाही हे स्पष्ट करावं. कायदा येऊ नये असं उद्धवजी म्हणू शकतात का? मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला हे स्पष्ट करावं की CAA लागू व्हावा की नाही. हिंदू शरणार्थी आणि बौद्ध निर्वासितांना नागरिकत्व मिळायला हवं की नाही."

उद्धव ठाकरे मतांचं राजकारण करत आहेत : अमित शाह पुढं म्हणाले, "त्यांना अल्पसंख्याकांच्या मतांची गरज आहे, त्यामुळंच आज उद्धव ठाकरे मतांचं राजकारण करत आहेत, आम्ही नाही. आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. धार्मिक छळामुळं या तीन देशांतून आलेल्या अल्पसंख्यकांना या देशाचं नागरिकत्व दिलं पाहिजे."

विरोधकांना अमित शाहांनी ठणकावलं :नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाल्यापासून विरोधक याला फुटीर कायदा म्हणत आहेत. विरोधी पक्षांच्या माध्यमातून स्थापन झालेल्या 'इंडिया' आघाडीनं म्हटलंय की, जर ते सत्तेवर आले तर ते CAA रद्द करतील. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी CAA मागं घेणं अशक्य असल्याचं म्हटलंय. हा घटनात्मक कायदा आहे. CAA कधीही मागे घेणार नाही, असंही ते म्हणाले. याबाबत आम्ही तडजोड करणार नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 'सीएए कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही. आपल्या देशात भारतीय नागरिकत्व सुनिश्चित करणे हा आमचा सार्वभौम अधिकार आहे. आम्ही त्याच्याशी कधीही तडजोड करणार नाही. विरोधक या मुद्द्यावरुन राजकारण करत आहेत. कारण त्यांना व्होट बँक मजबूत करायची आहे. विरोधकांकडं काम नाही, त्यांनी जे सांगितलं ते अजून पूर्ण केलेलं नाही. आमचं सरकार जे म्हणतं, ते पूर्ण करतं.'

'इंडिया' आघाडी सत्तेत येणार नाही : मुलाखतीदरम्यान, जेव्हा त्यांना विचारलं की विरोधी नेते म्हणत आहेत, 2024 मध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर ते CAA मागे घेतील. यावर अमित शाह म्हणाले, 'इंडिया' आघाडी सत्तेतच येणार नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं CAA आणला आहे. CAA रद्द करणं अशक्य आहे. हा पूर्णपणे घटनात्मकदृष्ट्या वैध कायदा आहे.

हेही वाचा :

  1. CAA Act : मोदी सरकारची मोठी घोषणा! देशभरात CAA लागू; काय आहे कायदा, वाचा सविस्तर
  2. देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू; काँग्रेसनं 'या'वरुन साधला निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details