महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरण; निराशेतून काँग्रेसची पातळी घसरली, अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Amit Shah Fake Video - AMIT SHAH FAKE VIDEO

Amit Shah Fake Video : बनावट व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी आज गुवाहटी इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. निराशेतून काँग्रेसची पातळी घसरल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. त्यासह आतापर्यंत झालेल्या मतदानात 100 पेक्षा जागा एनडीएला मिळणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Amit Shah Fake Video
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 12:16 PM IST

Updated : Apr 30, 2024, 12:24 PM IST

गुवाहाटी Amit Shah Fake Video :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डिप फेक व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबई युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानं मोठी खळबळ उडाली. आता प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरल्यानं निराशेतून त्यांची पातळी घसरली, असा हल्लाबोल त्यांनी केला. आतापर्यंतच्या दोन टप्प्यात एनडीएला 100 पेक्षा जास्त लोकसभा मतदार संघात विजय मिळणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

काँग्रेसची पातळी घसरली :मी तेलंगाणा इथं बोललो होतो, त्याचा फेक व्हिडिओ करुन काँग्रेस नेत्यांनी बनावट व्हिडिओ करुन सोशल माध्यमांवर व्हायरल केला. त्यांची निराशा इतक्या खालच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यांनी माझ्यासह अनेकांचे बनावट व्हिडिओ पसरवले आहेत. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही हे व्हिडिओ फॉरवर्ड करण्याचं काम केलं. हा बनावट व्हिडिओ सोशल माध्यमांवर पसरवल्यानं काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्यांवर गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई होत आहे. बनावट व्हिडिओ प्रसारित करुन जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न निषेधार्य आहे. भारतीय राजकारणातील कोणत्याही पक्षानं तो करू नये, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राहुल गांधी परांपरागत जागा सोडून पळाले :काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही काही निश्चित नाही. प्रियंका वाड्रा या निवडणूक लढवणार नाहीत, अशा चर्चा सुरू आहेत. त्यावर प्रसारमाध्यमांनी विचारलं असता, "राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा हे निवडणूक लढवतील की नाही, याबाबत आपल्याला माहिती नाही. परंतु त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. उत्तरप्रदेशातील त्यांच्या पारंपरिक जागा सोडून पळून गेले आहेत," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. अमित शाह डिपफेक व्हिडिओ प्रकरण : युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार, 16 जण चौकशीच्या फेऱ्यात - Amit Shah Doctored Video
  2. शरद पवारांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या, शेतकरी आत्महत्येसाठी पवारांनी माफी मागावी - अमित शाह - Amit Shah On Sharad Pawar
  3. अवकाळी पावसाचा अमित शाहांच्या सभेला फटका; पावसामुळं अमित शाह यांनी घेतलं भाषण आटोपतं, पाहा व्हिडिओ - Amit Shaha News
Last Updated : Apr 30, 2024, 12:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details