नवी दिल्लीNSA Ajit Doval :केंद्र सरकारनं पुन्हा एकदा वरिष्ठ IPS अधिकारी अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती केली आहे. ते तिसऱ्यांदा ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. त्याचवेळी, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं पुन्हा पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून IAS अधिकारी (निवृत्त) पीके मिश्रा यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यांची नियुक्ती 10 जून 2024 पासून लागू होईल. ती पुढील आदेशापर्यंत लागू राहील. याशिवाय अमित खरे, तरुण कपूर यांची पीएमओमध्ये पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डोवाल यांच्या नावाला मंजुरी :डोवाल, 1968 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशात सत्ता हाती घेतल्यापासून ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत आहेत. ते पीएम मोदींचे सर्वात विश्वासू अधिकारी मानले जातात. अजित डोवाल यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून दुसरा कार्यकाळ ३ जून रोजी पूर्ण झाला. यानंतर देशाला नव्या सुरक्षा सल्लागाराबाबत चर्चा सुरू होती. मात्र मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं पुन्हा एकदा डोवाल यांच्या नावाला मंजुरी दिली. यावेळी एनएसए होण्यात डोवाल यांना रस नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान मोदींनाही माहिती दिलीय.
डोभाल 30 मे 2014 रोजी पहिल्यांदा बनले NSA : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर डोवाल यांची 30 मे 2014 रोजी NSA म्हणून नियुक्ती करण्यात आली. एनएसए म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, डोवाल यांनी दहशतवादी संघटना ISIA च्या हल्ल्यानंतर इराकमधील तिक्रित येथील रुग्णालयात अडकलेल्या 46 भारतीय परिचारिकांना परत आणण्यात मदत केली. एनएसएचा पदभार स्वीकारण्यापूर्वी डोभाल आयबीचे संचालक होते.
आयबी ऑपरेशन्सचे संचालक म्हणून काम : NSA डोवाल राष्ट्रीय सुरक्षा तसंच भारताची गुप्तचर संस्था RAW शी संबंधित मुद्द्यांवरही लक्ष ठेवतात. डोभाल हे पाकिस्तान, अफगाणिस्तान, मध्य पूर्व यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे तज्ञ मानले जातात. अजित डोवाल यांनी 2017 मध्ये चीनसोबतच्या डोकलाम वादात, 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चीनसोबतच्या सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ते भारताचे विशेष प्रतिनिधीही आहेत. अजित डोवाल यांनी पंजाबमध्ये आयबी ऑपरेशन्सचे प्रमुख आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त संचालक म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळं त्यांना दोन्ही संवेदनशील राज्यांमध्ये पाकिस्तानच्या नापाक कारस्थानांचा सखोल अनुभव आहे. खलिस्तानी अतिरेकी, पाकिस्तान समर्थित दहशतवाद, जिहादचा सामना करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ऑपरेशन ब्लॅक थंडर दरम्यान आयएसआय एजंट :1988 मध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडर दरम्यान डोभाल आयएसआय एजंट असल्याचं दाखवून सुवर्ण मंदिरात घुसखोरी केली होती. खलिस्तानी फुटीरतावाद्यांकडं असलेल्या शस्त्रे, कागदपत्रांची माहिती त्यांनी त्यावेळी गोळा केली होती. या रणनीतीमुळं नंतर नॅशनल सिक्युरिटी गार्डला (NSG) खलिस्तानी फुटीरतावाद्यांपासून मुक्त करण्यात मदत झाली. डोभाल यांनी 1999 मध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट IC 814 च्या अपहरणानंतर कंदाहारमध्ये चार सदस्यीय वाटाघाटी पथकाचं नेतृत्व करून महत्त्वाची भूमिका बजावली होती.
NSA म्हणून डोवाल यांची भूमिका : NSA म्हणून डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार म्हणून भूमिका बजावत आहेत. भारताला असलेल्या अंतर्गत, बाह्य धोक्यांशी संबंधित सर्व बाबींवर ते नियमितपणे पंतप्रधानांना सल्ला देतात. ते सरकारच्या वतीनं धोरणात्मक आणि संवेदनशील मुद्द्यांवर लक्ष ठेवतात. RAW, IB, NTRO, MI, DIA, NIA या सर्व सुरक्षा एजन्सींकडून गुप्तचर माहिती गोळा करून ती पंतप्रधानांसोबत शेअर करणे हे डोवाल यांचं काम आहे.
'हे' वाचलंत का :
- मनसेच्या इंजिनाची दिशा काय? विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे राज ठाकरेंचे आदेश - Raj Thackeray on Assembly Election
- पीक कर्जावरून अंबादास दानवे आक्रमक, बँक अधिकाऱ्यांची घेतली शाळा - Banks Rejecting Farmer Crop Loans
- नरेंद्र मोदी यांची तिसरी पंतप्रधान पदाची कारकीर्द खडतर; एनडीएतील घटक पक्षांना गृहित धरून चालणार नाही - Brand Modi Faces Turbulence