महाराष्ट्र

maharashtra

तब्बल 46 वर्षानंतर आज उघडणार पुरी श्री जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडार - Puri Srimandir Ratna Bhandar

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 9:31 AM IST

Puri Shreemandir Ratna Bhandar : पुरी इथल्या श्री जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडार तब्बल 46 वर्षानंतर उघडण्यात येणार आहे. हे मंदिर अगोदर 1978 साली उघडण्यात आलं होतं.

Puri Shreemandir Ratna Bhandar
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

पुरी Puri Shreemandir Ratna Bhandar : पुरी इथल्या श्री जगन्नाथांवर देशभरातील भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देशभरातील भाविक पुरीतील जगन्नाथ मंदिराला भरभरुन दान देतात. श्री जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडार मागील 46 वर्षापासून उघडण्यात आलं नाही. आता ओडिशा सरकार पुरीतील श्री जगन्नाथ मंदिर रत्न भंडार उघडण्यास तयार झालं आहे. तब्बल 46 वर्षानंतर श्री जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडार उडण्यात येणार आहे. मंदिराचा खजिना 46 वर्षांपूर्वी 1978 मध्ये उघडण्यात आला होता.

तब्बल 46 वर्षानंतर उघडणार पुरीतील रत्न भांडार :ओडिशा सरकार आज पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडार उघडणार आहे. जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडार 1978 मध्ये उघडण्यात आलं होतं. पॅनेलच्या सूचनेनुसार पारंपरिक पोशाखातील पुजारी मंदिरात भगवान जगन्नाथांची पूजा करतील. यावेळी मंदिराचे अधिकृत कर्मचाऱ्यांसह स्नेक कॅचरही मंदिरात जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्नेक कॅचर कर्मचाऱ्यांसह आत सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रत्न भंडार उघडताना भारतीय रिझर्व बँकेची मदत :पुरीतील जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडार आज उघडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय कायदा मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पुरीतील श्री जगन्नाथ मंदिराचे मुख्य प्रशासक यांना ते कधी उघडण्यात येणार आहे, याबाबत मंदिर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले. मंदिरातील रत्न भंडार उघडताना प्रशासन भारतीय रिझर्व बँकेची मदत घेणार आहेत. त्यामुळे श्री मंदिरातील रत्न भंडार उघडताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे अधिकारी मंदिर व्यवस्थापन समितीला मदत करणार आहेत. रत्न भंडार उघडण्याची सगळी जबाबदारी श्री मंदिराच्या मुख्य प्रशासकांवर सोपवण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या समितीनं रत्न भंडार उघडण्याची केली शिफारस :राज्य सरकारनं पुरीतील श्री जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडार उघडण्यासाठी 16 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीनं 14 जुलैला रत्न भंडार पुन्हा उघडण्याची शिफारस केली. पारंपरिक वेशभूषेनंतर सर्व प्रथम मंदिरात भगवान जगन्नाथांची पूजा केली जाईल. खबरदारी म्हणून प्रथम अधिकृत कर्मचारी आणि त्यांच्यासह साप पकडणारा एक व्यक्ती रत्न भंडारात प्रवेश करतील, अशी शिफारस या समितीनं केली.

हेही वाचा :

  1. पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी; पाहा व्हिडिओ - Jagannath Yatra 2024
  2. भाजपा सरकारनं पूर्ण केलं वचन; सरकार स्थापन होताच उघडले जगन्नाथ मंदिराचे दरवाजे, 5 वर्षापासून होते बंद - Puri Sri Mandir Gate Opened
  3. खळबळजनक! गैर हिंदू बांगलादेशींचा जगन्नाथ मंदिरात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details