ETV Bharat / bharat

केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन : ढिगाऱ्याखाली दबून एका भाविकाचा मृत्यू तर तिघांना बचावण्यात यश - Debris Fall On Kedarnath Pilgrims - DEBRIS FALL ON KEDARNATH PILGRIMS

Debris Fall On Kedarnath Pilgrims : केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन होऊन त्याखाली काही भाविक अडकले आहेत. या ढिगाऱ्याखाळी दबून एका भाविकाचा मृत्यू झाला, तर तिघांना बचावण्यात एसआरडीएफच्या जवानांना यश आलं आहे.

Debris Fall On Kedarnath Pilgrims
बचावकार्य करताना जवान (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 10:19 AM IST

देहरादून Debris Fall On Kedarnath Pilgrims : केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन झाल्यानं भाविकांना मोठा फटका बसला आहे. या भूस्खलनात एक भाविक ढिगाऱ्याखाली दबून ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर इतर तीन भाविकांना बचावण्यात यश आलं. ही घटना सोनप्रयाग आणि गौरीकुंड या दरम्यान घडल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. भूस्खलन होऊन एका भाविकाचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन : केदारनाथ मार्गावर सातत्यानं भूस्खलन होत आहे. याबाबत माहिती देताना उपनिरीक्षक आशिष दिमरी म्हणाले की, सोनप्रयाग-गौरीकुंड दरम्यान भूस्खलन होत आहे. त्यामुळे भाविकांना यात्रेला जाताना अडचणी येत आहेत. सोमवारी रात्री उशिरा केदारनाथ महामार्गावरील टेकडीवरुन मलबा खाली आला. त्यामुळे काही भाविक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ढिगाऱ्याखाली दबून एका भाविकाचा मृत्यू : केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलनात एका भाविकाचा दबून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना आणि एसडीआरएफच्या पथकाला देण्यात आली. त्यानंतर एसआरडीएफच्या पथकानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एसडीआरएफ पथकानं घटनास्थळी बचावकार्य सुरू केलं. यावेळी बचाव पथकानं तीन जखमींना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं. मात्र यावेळी बचाव पथकाला ढिगाऱ्याखाली एक मृतदेह आढळून आला आहे. सर्व जखमींना प्राथमिक उपचारानंतर जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

भूस्खलन होत असल्यानं बचावकार्यात अडथळे : केदारनाथ यात्रा मार्गावर सातत्यानं भूस्खलन होत असून त्यामुळे यात्रा मार्गात मोठा अडथळा येत आहे. बचाव कार्य सुरू असतानाही सतत मलबा पडत असल्यानं परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. मात्र SDRF टीम आपलं काम पूर्ण मेहनतीनं करत आहे. स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी तळ ठोकून आहेत. सर्वजण मिळून बचावकार्य करत आहेत. या भूस्खलनात अजून एक भाविक दबल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र मृत आणि जखमींची अधिकृत माहिती अद्यापही प्रशासनाकडून मिळाली नाही.

हेही वाचा :

  1. केदारनाथमध्ये आढळले 3 मृतदेह ; पोलिसांसमोर ओळख पटवण्याचं आव्हान, एसडीआरएफ पथक घेत आहे आणखी शोध - Kedarnath Rescue Operation
  2. केदारनाथमध्ये अपघातग्रस्त हेलिकॉप्टर वाहून नेताना कोसळलं मंदाकिनी नदीत - Uttarakhand Helicopter Crash
  3. उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; महाराष्ट्रातील दोघांसह 3 यात्रेकरुंचा मृत्यू, 5 जखमी - Kedarnath land slide incident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.