"पहाटेपर्यंत डॉल्बी वाजणार", उदयनराजेंनी सुनावलं तर पालकमंत्री म्हणाले, "नियमाचं उल्लंघन केल्यास..." - Satara Ganeshotsav 2024 - SATARA GANESHOTSAV 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 10, 2024, 10:40 PM IST
सातारा Satara Ganeshotsav 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीवरील वेळेचं बंधन आणि वाद्यांवरील निर्बंधावरून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंनी एकमेकांना आव्हान दिलंय. प्रशासनाने नियमांचा बागुलबुवा उभा करून गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालू नये. असे कितीसे पोलीस आहेत. तेवढा पोलीस फोर्स जिल्ह्याला पुरेसा नाही. त्यामुळं इथं पण युपी, बिहारच होईल, या गोष्टीचं पोलिसांनी भान ठेवावं. लाठीचार्ज झाला तर 'अरे ला कारे'ने उत्तर देता येईल, असं उदयनराजेंनी सुनावलं आहे. उदयनराजेंच्या या आव्हानाला पालकमंत्री शंभूराज देसाईंनी देखील प्रत्त्युतर दिलंय. खासदार उदयनराजेंचं वक्तव्य आम्ही तपासून घेऊ. शासनाचे नियम आणि हायकोर्टाचे काय निर्देश आहेत, त्याची माहिती उदयनराजेंना दिली जाईल. कोणी नियम आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे.