महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंतरराष्ट्रीय सीमेवर पर्यटनाला चालना देण्यासाठी सांबामध्ये 'होम स्टे' सुरू - Homestay International Border

Homestay near the International Border : पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशानं जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर 'होम स्टे'सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत सीमेजवळ पर्यटकांच्या घरात बंकरही बांधण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सीमेचा अनुभव घेता येणार आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 10:06 PM IST

सांबा (जम्मू-काश्मीर) :Homestay near the International Border : पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशानं जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ होम स्टे सुरू करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीला या महिन्यात तीन वर्षे पूर्ण झाली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सीमेवर शांतता असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमा पर्यटनाला चालना देण्यासाठी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने रामगढ सेक्टरमधील प्रसिद्ध बाबा चमलियाल मंदिराजवळ होम स्टे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकतीच मान्यताही दिली आहे. भारत-पाकिस्तान सामंजस्याचं प्रतीक मानलं जाणारं, झिरो लाइनवरील बाबा चमलियालच्या प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक येत असतात.

पाकिस्तानचं शिष्टमंडळ मंदिरात दर्शनासाठी येतं : येथे वार्षिक यात्रेदरम्यान, पाकिस्तानचे शिष्टमंडळ मंदिरात दर्शनासाठी येत असते. परंतु, 13 जून 2018 रोजी सीमापार गोळीबारात असिस्टंट कमांडंटसह चार बीएसएफ जवानांचा मृत्यू झाल्यानंतर यावर बंदी घालण्यात आली. तसंच, गेल्या वर्षी (दि.9 नोव्हेंबर)च्या मध्यरात्री रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तान रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवाना वीरमरण आलं होतं.

पर्यटकांना सीमेवर राहण्याची अनुभूती : दोन्ही देशांनी (दि. 25 फेब्रुवारी 2021) रोजी नव्यानं युद्धविरामावर सहमती दर्शविल्यानंतर ही पहिली जीवितहानी होती. येथील एक माजी सरपंच मोहन सिंग भाटी हे जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (IB) त्यांच्या होम स्टेवर पर्यटकांचं स्वागत करतात. तसंच, सीमेवर येणाऱ्या पर्यटकांना सीमेवर राहण्याची अनुभूती देण्यासाठी आणि सीमेपलीकडून गोळीबार झाल्यास सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठीही त्यांनी एक सुसज्ज भूमिगत बंकरही बांधला आहे.

अनेक ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता : दुसऱ्या बाजूनं गोळीबार झाल्यास आपल्या बाजूनं सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी भूमिगत बंकरदेखील बांधले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटल्याप्रमाणे आपण आपला शेजारी बदलू शकत नाही. पण, नको त्या परिस्थितीत अडकू नये, यासाठी आपण तयार असले पाहिजे. या संदर्भात सांबा उपायुक्त अभिषेक शर्मा म्हणाले की, "जिल्ह्यातील 55 किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर चमलियाल मंदिर, 300 वर्षे जुनं मंदिर बामू चक, बाबा बळी करण अशी अनेक ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात."

होमस्टेला प्रोत्साहन : केंद्र आणि जम्मू-काश्मीर प्रशासन दोन्ही सीमा पर्यटनाला चालना देण्यावर भर देत आहेत. उपायुक्त शर्मा म्हणाले की, "गेल्या वर्षी चमलियाल तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या पर्यटकांना येथे राहण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र, ही तफावत भरून काढण्यासाठी आम्ही होमस्टेला प्रोत्साहन देत आहोत. तसंच, सीमेवरील रहिवाशांकडून याबाबत प्रतिसाद मिळत आहे," असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

1मुंडे, महाजन, मुनगंटीवार लढणार नाहीत लोकसभा निवडणूक, 'हे' आहे मुख्य कारण

2नरेंद्र मोदी सरकारकडून सत्तेचा गैरवापर, हेलिपॅडसाठी साडेतीन कोटी तर मंडपासाठी १२ कोटी खर्च केल्याचा पटोलेंचा दावा

3लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details