महाराष्ट्र

maharashtra

कोरोना : राज्य शासन, बीएमसीच्या कामाला सलाम! क्रिकेटपटूने केलं कौतूक

By

Published : Mar 15, 2020, 11:55 PM IST

धवल कुलकर्णीने आपल्या ट्विटमध्ये राज्य सरकार कोरोना बाबतीत अलर्ट आहे. मुंबई पालिका तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी २४ तास दक्ष आहेत. ते लोकांना मदत तसेच समाजात जागरुकता करत आहेत. यामुळे त्यांना 'सलाम' असे म्हणत त्याने त्या सर्वांचे आभार मानले आहे.

coron0avirus solution dhawal kulkarni salute for state government and bmc, mumbai municipal corporation says it is our duty
कोरोना : राज्य सरकार, बीएमसी तुमच्या कामाला सलाम, क्रिकेटपटूने ट्विटद्वारे केलं कौतूक

मुंबई- राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांच्याकडून कोरोना विषाणू आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते पाहून क्रिकेटपटू धवल कुलकर्णी चांगलाच प्रभावित झाला आहे. त्याने महापालिका आणि राज्य सरकारच्या कामाचे ट्विटद्वारे कौतुक केले आहे. मुंबई महापालिकेने यावर 'हे तर आमचे कर्तव्यच आहे' असे म्हणत त्याला प्रतिसाद दिला आहे.

धवल कुलकर्णीने आपल्या ट्विटमध्ये राज्य सरकार कोरोना बाबतीत अलर्ट आहे. मुंबई पालिका तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी २४ तास दक्ष आहेत. ते लोकांना मदत तसेच समाजात जागरुकता करत आहेत. यामुळे त्यांना 'सलाम' असे म्हणत त्याने त्या सर्वांचे आभार मानले आहे.

दरम्यान धवलने केलेल्या कौतुकावर मुंबई महापालिकेने, हे तर आमचे कर्तव्यच आहे, असं उत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करत आहोत. यासाठी नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावं, असे आवाहन केलं आहे.

कोरोना विषाणूच्या फैलाव जगभरातील १०० हून अधिक देशात झाला असून या विषाणूमुळे जगभरात जवळपास ६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे ३३ रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमिवर मुंबई, पुणे शहरांतील मॉल्स, जलतरण तलाव, व्यायाम शाळा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा -'रोहित एकमेव फलंदाज ..जो टी-२० क्रिकेटमध्ये करू शकतो द्विशतक'

हेही वाचा -ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई, देसी अवतारात केला साखरपुडा

ABOUT THE AUTHOR

...view details