ETV Bharat / sports

गर्लफ्रेंडनं सुवर्णपदक जिंकताच बॉयफ्रेंडनं केलं 'प्रपोज'; ऑलिम्पिकदरम्यान 'सिटी ऑफ लव्ह'मध्ये काय घडलं, एकदा व्हिडिओ बघाच... - Paris Olympics 2024

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 3, 2024, 3:15 PM IST

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शुक्रवारी एका बॅडमिंटनपटूनं मिश्र दुहेरीच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर आपल्या मैत्रिणीला प्रपोज केलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Paris Olympics 2024
गर्लफ्रेंडनं सुवर्णपदक जिंकताच बॉयफ्रेंडनं केलं 'प्रपोज' (AP Photo)

पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सातव्या दिवशी आनंदी तसंच प्रेमानं भरलेलं दृश्य दिसले. शुक्रवारी जेव्हा चिनी बॅडमिंटनपटू लियू युचेननं सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याची शटलर गर्लफ्रेंड हुआंग याकिओंगला एका गुडघ्यावर बसून प्रपोज केलं आणि दोघांमधलं प्रेम फुललं.

ऑलिम्पिकमध्ये व्यक्त केलेलं प्रेम : हुआंग याकि ओंगनं मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत तिच्या दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करुन झेंग सिवेईसह सुवर्णपदक जिंकल्यानंतर हा प्रसंग घडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका गुडघ्यावर बसून केलं प्रपोज : शुक्रवारी तिचा जोडीदार झेंग सिवेईसह बॅडमिंटन मिश्र दुहेरीत अव्वल स्थान मिळविल्यानंतर, हुआंग या क्विओंगला तिचा प्रियकर लियू युचेननं प्रपोज केलं होतं. पदक स्विकारल्यानंतर, लियू फुलं घेऊन हुआंगची वाट पाहत होता आणि ती येताच लिऊ जमिनीवर एका गुडघ्यावर खाली बसला आणि लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी त्यानं अंगठी काढताच हुआंग आश्चर्यचकित झाली. या प्रस्तावानं हुआंग याकिओंग भारावून गेली आणि तिनंही लगेच होकार दिला. चाहत्यांना हा प्रसंग आवडला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

याआधीही घडलं असं : हुआंग या क्विओंग आणि लियू युचेन यांच्या आधीही ऑलिम्पिकच्या सुरुवातीला असंच दृश्य पाहायला मिळालं होतं. ओपनिंग सेरेमनीदरम्यान अर्जेंटिनाच्या एका खेळाडूनं आपल्या टीममेटला सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. अर्जेंटिनाच्या पुरुष हँडबॉल संघाचा खेळाडू पाब्लो सिमोनेटनं अर्जेंटिनाच्या महिला हॉकी संघाची खेळाडू मारिया कॅम्पॉयला प्रपोज केलं होतं. हे दोन्ही खेळाडू 2015 पासून एकमेकांना डेट करत होते. या खास क्षणाचा व्हिडीओ स्वतः ऑलिम्पिक गेम्सनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला, जो खूप व्हायरल झाला.

हेही वाचा :

  1. ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताला मिळणार पहिलं पदक? दीपिका कुमारी इतिहास रचण्यापासून दोन विजय दूर - Paris Olympics 2024
  2. भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय; ऑलिम्पिकमध्ये 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.