पुणे Rohit Pawar criticized Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (3 ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना महाविकास आघाडीकडून मला ठरवून टार्गेट केलं जातंय. तसंच माझ्याबाबत फेक नेरिटीव्ह सेट केलं जातंय, असं ते म्हणाले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता, "खालच्या पातळीचे कारनामे कोणी करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. ते जर अशा पद्धतीनं कुरघोडी करत असतील तर साहजिकच त्यांना टार्गेट केलं जाईल", असा टोला त्यांनी लगावला.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार : इंदापूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवीण माने यांनी आज (3 ऑगस्ट) रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, "पुढं जाऊन पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळेल सांगता येत नाही. यासर्व गोष्टींचा निर्णय वरिष्ठ घेतात. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या आदेशानं आज प्रवीण माने यांचा पक्ष प्रवेश होत आहे."
देवेंद्र फडणवीसांवर साधला निशाणा : यावेळी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत रोहित पवार म्हणाले, "आमचे नेते अनिल देशमुख यांनी सर्व गोष्टींचा खुलासा केल्यानंतर काल अचानक सचिन वाजे यांना मेडिकल लिव्ह मिळाली. त्यानंतर ते आता मीडियासमोर येत प्रतिक्रिया देताय. अशा पद्धतीचं राजकारण सुरू असेल तर लोक कसा विश्वास ठेवतील? गुजरातचा विकास करण्याच्या नादात त्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलंय आणि म्हणूनच त्यांना टार्गेट केलं जातय." पुढं वीज प्रकल्पाच्या खासगीकरणासंदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले की, "आज वीज प्रकल्पाचं खासगीकरण देवेंद्र फडणवीस करताय. आता सरकार येणार नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळं अशाप्रकारे खासगीकरण केलं जातय."
हेही वाचा -
- कैदेतील सचिन वाजेला प्रसार माध्यमांशी बोलण्याची परवानगी कशी? वाजेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करण्याची कॉंग्रेसची मागणी - Atul Londhe On Sachin Waze
- अंडरवल्ड डॉन दाऊद, छोटा शकील ते अँटिलिया; नेहमीच वादग्रस्त राहिली सचिन वाजे यांची कारकीर्द - Sachin Vaze Controversial
- "निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून गुंडांचा वापर...", संजय राऊतांचा भाजपावर घणाघात - Sanjay Raut On Devendra Fadnavis