पॅरिस Paris Olympics 2024 Archery : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजीच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र दीपिकाला पराभवाचा सामना करावा लागला. दीपिकाला कोरियाच्या नाम एस च्या विरोधात 6-4 नं पराभवाचा सामना करावा लागला.
Women's Individual Recurve, 1/8 Elimination Round
— SAI Media (@Media_SAI) August 3, 2024
In a display of dominant archery, Deepika Kumari beats Germany’s🇩🇪 Michelle Kroppen 6-4.
She will face the winner between Romania's 🇷🇴 Madalina Amaistroaie and South Korea's 🇰🇷 Nam Su-Hyeon in the quarterfinal at 4.30 pm IST.… pic.twitter.com/15MP6b7kwD
दीपिकाची उपांत्यपूर्व फेरीत धडक : 30 वर्षीय दीपिकानं उपउपांत्यपूर्व सामन्यात पहिला सेट 27-24 असा जिंकला, त्यामुळं तिच्या प्रतिस्पर्ध्याला पहिल्या प्रयत्नात केवळ सहा गुण मिळवता आले. दोन्ही तिरंदाजांनी 27 पॉइंट्स केल्यानं दुसरा सेट अनिर्णित राहिला. यानंतर दीपिकानं तिसरा सेट 26-25 असा जिंकला, मात्र क्रॉपेननं शानदार पुनरागमन करत चौथा सेट 29-27 असा जिंकला. मात्र, भारताच्या अनुभवी तिरंदाजानं स्वत:वर नियंत्रण ठेवलं आणि पाचव्या सेटमध्ये तिच्या जर्मन प्रतिस्पर्ध्याची 27 गुणांची बरोबरी करुन उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलं. आजच खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना कोरियन तिरंदाज नॅम एस हिच्याशी होणार आहे.
भजन कौर बाहेर : दुसरीकडे, भजन कौरला तिच्या इंडोनेशियन प्रतिस्पर्ध्याकडून शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला. भजन कौरला इंडोनेशियाच्या दयांदा चोइरुनिसाकडून 5-6 नं पराभव पत्करावा लागला. भजननं नियमित नेमबाजीचा सामना 5-5 असा बरोबरीत सोडवला. भजन कौरनं शानदार खेळ केला आणि सामना शूट-ऑफपर्यंत नेला, परंतु तिला इंडोनेशियाच्या चारु निशा दया नंदाकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पाच सेटनंतर स्कोअर 5-5 असा बरोबरीत होता, त्यानंतर सामना शूट-ऑफपर्यंत पोहोचला, यात चारुनं 9 आणि भजननं 8 पॉइंट्सचे शॉट मारले आणि यासह ती बाद झाली.
हेही वाचा :
- गर्लफ्रेंडनं सुवर्णपदक जिंकताच बॉयफ्रेंडनं केलं 'प्रपोज'; ऑलिम्पिकदरम्यान 'सिटी ऑफ लव्ह'मध्ये काय घडलं, एकदा व्हिडिओ बघाच... - Paris Olympics 2024
- एक निशाणा चुकला अन् मनू भाकरची ऐतिहासिक 'मेडल हॅटट्रिक' हुकली - Paris Olympics 2024
- स्वप्निल कुसाळे आता 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी' ; ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच मध्य रेल्वेनं दिली पदोन्नती - Paris Olympics 2024