ETV Bharat / sports

ऑलिम्पिक पदक विजेता सरबजोत सिंग म्हणाला, "ऑलिम्पिक पदकासाठी 8 वर्षे केली मेहनत,.." - Sarabjot Singh

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 3, 2024, 7:59 PM IST

Updated : Aug 4, 2024, 12:11 PM IST

Sarabjot Singh : पॅरिसहून परतल्यानंतर 'ईटीव्ही भारत'नं सरबजोत सिंगशी खास बातचीत केली. या संभाषणात सरबजोत सिंगनं विजयानंतर मिळालेला प्रतिसाद आणि आपल्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितलं.

Sarabjot Singh
सरबजोत सिंग (ETV Bharat Reporter)

डेहराडून (उत्तराखंड) Sarabjot Singh : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत 3 पदकं जिंकली आहेत. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी शानदार कामगिरी केली आहे. मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकून भारताचं पदकांचं खातं उघडलं. यानंतर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघात मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनीही चमकदार कामगिरी केली. या दोन्ही नेमबाजांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताची पदकतालिका पुढं नेली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करुन भारतात परतलेला यशस्वी नेमबाज सरबजोत सिंगचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सरबज्योत सिंग आज डेहराडूनला पोहोचला, तिथं त्यानं ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसोबत खास बातचीत केली. या संवादात सरबजोत सिंगनं त्याच्या यशापर्यंतच्या शूटिंगच्या प्रवासाबद्दल सांगितलं. तसंच भविष्यासाठी करावयाचं नियोजनही त्यांनी सांगितलं.

सरबजोत सिंगशी खास बातचीत (ETV Bharat)

पदकासाठी 8 वर्षे घाम गाळला : ईटीव्ही भारतशी खास संवाद साधताना ऑलिम्पिक पदक विजेता सरबजोत सिंगनं पॅरिसमधील कामगिरीवर खूश नसल्याचं सांगितलं. जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत समाधान मिळणार नाही, असं त्यांनी सांगितलं. सरबजोत सिंगनं तब्बल 8 वर्षे या पदकाची तयारी केली. आठ वर्षे तो सतत ऑलिम्पिकचा विचार करत होता. जगामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणं हे नेहमीच स्वप्न राहिलं आहे. जेव्हा तो श्रेणीत पोहोचला तेव्हा पदक जिंकण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. तेव्हा फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत होता. या गेममध्ये त्याला काही समस्या आल्या, परंतु सततच्या मेहनतीमुळं आणि प्रयत्नांमुळे हळूहळू सर्वकाही सामान्य झाल्याचं त्यानं सांगितलं.

शालेय जीवनात सरबज्योत सिंगला फुटबॉलची आवड : सरबजोत सिंगला शालेय जीवनात फुटबॉल खेळायचा. त्यानंतर त्याला नेमबाजीसाठी विचारण्यात आलं. त्यानंतरच त्यानं नेमबाजी सुरु केली. नेमबाजीचा सराव करण्यासोबतच त्यानं स्पर्धा खेळायला सुरुवात केली. भारतासाठी खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते. भारताकडून खेळण्यासाठी कठोर प्रशिक्षणही घेतल्याचं यावेळी सरबजोत सिंगनं सांगीतलं. त्याच्या मनात सुरुवातीपासूनच देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. जी त्याला आपल्या खेळातून पूर्ण करायची होती. पदक जिंकल्यानंतर अजून खूप काही करायचं असल्याचं सरबजोत सिंगनं सांगितलं. तसंच सध्या माझं संपूर्ण लक्ष 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकावर असल्याचं त्यानं सांगितलं.

सरबजोत सिंगनं खेळाडूंना दिला यशाचा मंत्र : आपल्या खेळाच्या यशाबाबत बोलताना सरबजोत म्हणाला, माझ्या लक्षात आलं आहे की, अनेक खेळाडू रोज एकच दिनचर्या पाळतात आणि काही नवीन घडत नाही, असा विचार करणं सोडून देतात. मी असा कधीच विचार केला नाही, मी दररोज मजा केली, दररोज शिकण्याचा प्रयत्न केला, त्याचं फळ म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकचं कांस्यपदक. खेळाडूनं कधीही मागे वळून पाहू नये. खेळाडूने कधी थांबू नये, कोणत्याही खेळाडूला आपण काही करू शकत नाही असे वाटत असेल तर त्याने पुन्हा पुन्हा सराव करावा. मेहनत हा यशाचा मूळ मंत्र असल्याचं त्यानं सांगितलं.

हेही वाचा :

  1. एक निशाणा चुकला अन् मनू भाकरची ऐतिहासिक 'मेडल हॅटट्रिक' हुकली - Paris Olympics 2024
  2. "भारत खूप आनंदी आहे...", नेमबाजीत कांस्य पदक जिंकणाऱ्या मनू-सरबज्योतचं दिग्गजांकडून कौतुक - Paris Olympics 2024

Last Updated : Aug 4, 2024, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.