महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्या घटली, 115 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू

By

Published : Nov 29, 2021, 8:33 PM IST

कोरोनाचा ( Mumbai Corona ) प्रसार आणि मृत्यू रोखण्यासाठी पालिका प्रशासन ( Municipal administration ) सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार व रुग्णसंख्या आटोक्यात आहे. आज (सोमवारी) 115 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 4 मृत्यूंची नोंद झाली आहे.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाचा ( Mumbai Corona Update ) प्रसार आणि मृत्यू रोखण्यासाठी पालिका प्रशासन ( Municipal administration ) सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार व रुग्णसंख्या आटोक्यात आहे. आज (सोमवारी) 115 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 4 मृत्यूंची नोंद झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2647 इतका आहे.

115 नवे रुग्ण -

मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्चला पहिला रुग्ण आढळून आला. 17 मार्चला मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून आतापर्यत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार आटोक्यात असल्याने आज सोमवारी 115 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 62 हजार 731 वर पोहचला आहे. आज 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 16 हजार 334 मृत्यूंची नोंद झाली आहे. 269 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 7 लाख 41 हजार 769 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के -

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 2647 दिवस इतका आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आज 26 हजार 307 चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या पावणे दोन वर्षात एकूण 1 कोटी 23 लाख 96 हजार 039 चाचण्या करण्यात आल्या आहेत. झोपडपट्टीत रुग्ण आढळून येत नसल्याने एकही झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही. तर इमारतींमध्ये रुग्ण आढळून येत असल्याने 19 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -Omicron Variant : ओमिक्रॉनसंदर्भात मंत्रिमंडळ बैठक.. परदेशातील प्रवाशांची माहिती गोळा करा, मुख्यमंत्र्याचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details