नवी दिल्ली Border Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. या मालिकेबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंगनं मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यानं आधीच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा विजेता घोषित केला आहे. यावेळी ऑस्ट्रेलिया भारताला पराभूत करेल, असा विश्वास पाँटिंगनं व्यक्त केलाय.
Ricky Ponting predicts 3-1 series victory for Australia against India in Border Gavaskar Trophy. [ICC] pic.twitter.com/Jw5fYN03Rp
— Johns. (@CricCrazyJohns) August 13, 2024
रिकी पाँटिंग काय म्हणाला ? : रिकी पाँटिंग म्हणाला की, "भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका जोरदार होईल यात शंका नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाला भारतासमोर स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण गेल्या दोन मालिकांमध्ये भारतानं विजय मिळवला आहे. यावेळी पाच कसोटी सामने होणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत याआधी फक्त चार सामन्यांची मालिका खेळवली जात होती, मात्र यावेळी पाच सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे."
ऑस्ट्रेलियाविरोधात भाष्य करू शकत नाही : "बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी मी ऑस्ट्रेलियाला विजयाचा दावेदार मानत आहे. मी ऑस्ट्रेलियाविरोधात कधीच भाष्य करू शकत नाही. खराब हवामानामुळे एक किंवा दोन सामने अनिर्णित राहतील. त्यामुळं मला वाटतं की, 3-1 ने ऑस्ट्रेलिया ही मालिका आपल्या नावावर करेल." अशी भविष्यवाणी पाँटिंगनं केलीय.
2023 मध्ये भारतानं जिंकली होती ट्रॉफी : याआधी भारतानं 2023 मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 असा विजय मिळवला होता. 2023 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 4 कसोटी सामने खेळवण्यात आले होते. या मालिकेतील पहिला सामना नागपुर येथे खेळला गेला, ज्यात भारतानं एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही भारतानं आपला दबदबा कायम राखत 6 गडी राखून विजय मिळवला. मात्र, यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियानं भारतावर 9 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर मालिकेतील चौथी आणि शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये यावेळी पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघ मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होईल, तर शेवटचा सामना 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान खेळवला जाईल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चं वेळापत्रक
- पहिला सामना – 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ
- दुसरा सामना- 06 ते 10 डिसेंबर, ॲडलेड
- तिसरा सामना – 14 ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन
- चौथा सामना - 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
- पाचवा सामना – 03 ते 07 जानेवारी, सिडनी
हेही वाचा
- मनू भाकर अन् नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा, मनूच्या आईनं दिली 'ही' प्रतिक्रिया - Neeraj Chopra Manu Bhaker
- सूर्यकुमार यादव मुंबईसाठी बुची बाबू टूर्नामेंट खेळणार - Shreyas Iyer
- पॅरालिम्पिक 2024 पूर्वी भारताला धक्का; सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू 18 महिन्यांसाठी निलंबित - Paralympics 2024
- मनू भाकर नीरज चोप्राशी लग्न करणार का? मनूच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं - Manu Neeraj Marriage