हैदराबाद LEFT HANDERS DAY : दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन साजरा करतात. हा दिवस डावखुऱ्यांमध्ये असणारे विशेष गुण आणि अडथळे ओळखून त्यांचे कौतुक करण्याचा दिवस आहे. डावखुऱ्या लोकांना भेडसावणाऱ्या विशिष्ट आव्हानांना सामोरे जाणे आणि त्यांच्या अद्वितीय गरजांना समर्थन देण्याचा हा दिवस आहे.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या दिनाची थीम जगभरातील डावखुऱ्यांचे वैविध्य आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रदर्शन यावर केंद्रित आहे. आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन साजरा करून त्यांच्या व्यक्तिमत्वातील वेगळेपण यांचा गौरव केला जातो. या दिवसाची सुरुवात डीन आर कॅम्पबेल यांनी 1976 मध्ये केली. अशी एक वदंता आहे की इतिहासात, 1600 च्या एका दशकात जेव्हा डावखुऱ्यांनी सैतानशी युती केल्याचं मानलं जात होतं. तेव्हापासून ते आधुनिक युगापर्यंत, त्यांना दैनंदिन कामं करण्यात सातत्याने अडथळे आणि आव्हानांना सामोरं जावे लागलं, असं मानण्यात येतं.
आंतरराष्ट्रीय डावखुरा दिनाचे महत्त्व: डावखुऱ्यांच्या विशिष्ट अनुभवांबद्दल जागरुकता वाढवण्याचा आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय क्षमता आणि योगदानाची सर्वसमावेशकता, समज आणि ओळख जगाला करुन देण्याचा या दिवसाच्या निमित्ताने प्रयत्न होत आहे.
डावखुरा दिन ही एक अशी संधी असते त्यानिमित्ताने काय करता येईल....:
- जागरुकता वाढवा : डावखुऱ्या लोकांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल लोकांना शिक्षित करा.
- विविधता साजरी करा: डावखुऱ्या व्यक्तींचे अद्वितीय गुण आणि प्रतिभा ओळखून त्याचा प्रचार करा.
- बदलांसाठी विचार करा : डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या लोकांना एकाच प्रकारची उपकरणे वापरावी लागतात. त्यामुळे डावखुऱ्यांसाठी वेगळी उत्पादने उदा. कात्री, माऊस, बंदुक इत्यादी त्यांच्या गरजेप्रमाणे डिझाइन करण्यासाठी व्यवसाय आणि उत्पादकांना प्रोत्साहित करा.
डावखुऱ्यांची मनोरंजक वैशिष्ट्ये
- जगातील सरासरी १२ टक्के लोक डावखुरे तर हाताने, ८७ टक्के उजव्या हाताने काम करतात तर १ टक्के लोक दोन्ही हाताने काम करु शकतात अर्थात ते सव्यसाची आहेत.
- डावखुऱ्या लोकांना ऍलर्जी होण्याची शक्यता जास्त असते तसंच त्यांना दुर्मीळ स्वयं-प्रतिकार आजार होण्याचा अडीचपट जास्त धोका असतो.
- एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, उजव्या लोकांपेक्षा डावखुऱ्यांना मायग्रेनचा त्रास जास्त होतो.
- बहुतेक डावखुऱ्यांच्या झोपेची गुणवत्ता इतरांपेक्षा वाईट असते.
- डावखुरे मेंदूच्या उजव्या बाजूचा अधिक वापर करतात.
- डावखुरे इतरांपेक्षा लवकर स्ट्रोकमधून बरे होण्याची शक्यता असते.
- डावखुरे अधिक वेगानं इंग्रजी टायपिंग करु शकतात. कारण ते QWERTY कीबोर्डवर, फक्त डाव्या हाताचा वापर करून 3,000 हून अधिक इंग्रजी शब्द टाइप करू शकतात. केवळ उजव्या हाताने सुमारे 300 शब्द टाइप करता येतात.
अनेक संस्कृती आणि देशांमध्ये, डावखुरा असणे अनैसर्गिक मानले जाते. भारतासारख्या पूर्वेकडील देशांमध्ये किंवा मध्यपूर्वेत, डाव्या हाताने काम शुभ काम करणे अयोग्य मानले जाते. इंग्लडमध्येही, डावखुऱ्या मुलांना एकेकाळी त्यांचे उजवे हात वापरण्याची सक्ती केली जात होती.
डावखुऱ्यांचा संघर्ष : सामाजिक आणि सांस्कृतिक अपेक्षांमुळे, अनेक डावखुऱ्या मुलांना त्यांच्या उजव्या हाताने लिहिण्यास आणि इतर क्रिया करण्यास भाग पाडलं जातं. या सक्तीच्या अनुकूलतेमुळे डावखुऱ्या मुलांच्या विकासात विविध समस्या उद्भवू शकतात. उदा. शिकण्यात अडचणी, डिस्लेक्सिया, तोतरेपणासारखे बोलण्याचे विकार आणि बऱ्याच गोष्टी आहेत. डावखुऱ्या व्यक्ती अनेकदा त्यांच्या शरीराच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या कामांसाठी वापरतात. ज्यामुळे दोन्ही बाजूंना दुखापत होऊ शकते.
उजव्या व्यक्तींच्या तुलनेत डावखुऱ्या लोकांना दुखापतीचा जास्त धोका असतो. मुख्यतः उजव्या हाताच्या वापरासाठी डिझाइन केलेल्या साधनांच्या तोट्यांव्यतिरिक्त, डावखुऱ्या व्यक्तींना हेतुपुरस्सर भेदभाव आणि निरुत्साहाचा सामना करावा लागला आहे. काही समाजांमध्ये, बहुसंख्य उजव्या लोकांद्वारे त्यांना दुर्दैवी किंवा अगदी द्वेषपूर्ण म्हणून पाहिले जाते.
आधुनिक जगातील काही सुप्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्ती : अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रतन टाटा, करण जोहर, कपिल शर्मा, प्रिन्स विल्यम, केनू रीव्हस, बझ ऑल्ड्रिन, ओप्रा विन्फ्रे, ज्युलिया रॉबर्ट्स, लेब्रॉन जेम्स, नेड फ्लँडर्स, लेडी गागा, बराक ओबामा, निकोल किडमन, जॉन स्टीवर्ट, बेबे रुथ, स्कार्लेट जॉन्सन, ह्यू जॅकमन, कार्डी बी, बिल गेट्स, अँजेलिना जोली, ज्युडी गारलँड, विल फेरेल, मॉर्गन फ्रीमन, डेव्हिड बोवी, सेठ रोजेन, सँडी कौफॅक्स, मार्क झुकरबर्ग, टीना फेस, गॉर्डन रामसे, एम्मा थॉम्पसन, मायकेल विक, जस्टिन बीबर, एमिनेम, बिली रे सायरस आणि रँडी जॉन्सन