महाराष्ट्र

maharashtra

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करा-सीएआयटीची मागणी

By

Published : Jan 25, 2021, 8:18 PM IST

अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे (सीएआयटी) महासचिव प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, नियमांप्रमाणे ई-कॉमर्स कंपन्यांना उत्पादकांची सविस्तर माहिती उत्पादनांवर देणे बंधनकारक आहे. तसेच मूळ देश, उत्पादनाचे जेनरिक नाव, कमाल किंमत आणि इतर माहिती द्यावी लागते.

प्रवीण खंडेलवाल
प्रवीण खंडेलवाल

नवी दिल्ली- व्यापाऱ्यांची संघटना सीएआयटीने पुन्हा एकदा ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात दंड थोपटले आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना पत्र लिहून अ‌ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विग्गी यांच्यासह विविध ई-कॉमर्स कंपन्यांवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे. या कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सीएआयटीने केला आहे.

अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे (सीएआयटी) महासचिव प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, नियमांप्रमाणे ई-कॉमर्स कंपन्यांना उत्पादकांची सविस्तर माहिती उत्पादनांवर देणे बंधनकारक आहे. तसेच मूळ देश, उत्पादनाचे जेनरिक नाव, कमाल किंमत आणि इतर माहिती द्यावी लागते. हा नियम जून २०१७ मध्ये अस्तित्वात आला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. त्यामुळे १ जानेवारी २०२१८ पासून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र, तीन वर्षे उलटूनही ई-कॉमर्स कंपन्यांकडून विशेषत आघाडीच्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून अंमलबजाणी होत नाही.

हेही वाचा-सिमेंटसह स्टीलच्या पर्यायावर संशोधन व्हावे-नितीन गडकरी

फुड बिझनेस ऑपरेटर्स (एफबीओ) असेल्या ई-कॉमर्स कंपन्यांना अन्न सुरक्षा आणि मानक यंत्रणेचे (एफएसएसएआय) नियम लागू आहेत. मात्र, स्विग्गी आणि झोमॅटोकडून नियमांचे पालन होत नाही, असा सीएआयटीने आरोप केला आहे. हा ई-कॉमर्स कंपन्यांचा दिवसाढवळ्या भारतामधील दरोडा आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.

हेही वाचा-टेस्लाचे सॉफ्टवेअरसह हार्डवेअर वायमोपेक्षा चांगले-इलॉन मस्क-

याबाबत प्रतिक्रिया विचारली असता अ‌ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो आणि स्विग्गीकडून कोणतेही उत्तर आले नाही.

दरम्यान, ई-कॉमर्स कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा सीएआयटीने वारंवार आरोप केला आहे. तसेच बाजारात अनुचित प्रथांचा ई-कॉमर्स कंपन्यांकडून आरोप होत असल्याचेही यापूर्वी सीएआयटीने म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details