ETV Bharat / politics

राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक, भेटीमागचं 'राज'कारण काय? - Raj Thackeray Meet CM Eknath Shinde - RAJ THACKERAY MEET CM EKNATH SHINDE

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा देत राज्यात दौरे सुरू केलेल्या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही मुख्यमंत्र्यांशी दिलजमाई सुरू असल्याचं बोललं जात आहे.

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde
राज ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 5:41 PM IST

मुंबई Raj Thackeray Meet CM Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि अजित पवार गटात मोठा वाद सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. 'वर्षा' निवास्थानी या दोघांमध्ये बैठक झाली आहे. विविध विषयांसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक झाल्याचं सांगण्यात येतय.

'या' विषयावर झाली चर्चा : राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीत मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घराचा प्रश्न तसंच वसाहतीमधील पोलिसांच्या घरांचा प्रश्न आणि बीडीडीच्या विकासाला वेग यावा यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. अशी माहिती देण्यात आली.

मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध व्हावी, यासाठीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर, अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तर प्रशासनातील मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राज ठाकरे यांची राजकीय मोर्चे बांधणी : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत बोलताना ज्येष्ठ राजकीय पत्रकार चंदन शिरवाळे म्हणाले, "आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात त्यांना राज्यात असलेली मनसेची ताकद माहीत आहे. मुंबई आणि परिसरात निश्चितच मनसेची ताकद आहे. ती ताकद अधिक वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी मुंबई आणि परिसरातील नागरी प्रश्न उचलून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे." राज ठाकरेंपुढे काय पर्याय असतात याबाबतही शिरवाळे यांनी भाष्य केलं. "या सोबतच आगामी निवडणुकांमध्ये महायुतीसोबत जाण्यासाठी काय पर्याय असू शकतात याची चाचपणी सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून करण्याचा राज यांचा प्रयत्न असावा. महायुती सोबत गेल्यास राज ठाकरे यांच्या मनसेला नेमक्या किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज घेण्याचं काम मनसेकडून सुरू आहे." असंही शिरवाळे म्हणाले.

हेही वाचा

  1. “अमित शाह अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज”, उद्धव ठाकरेंचा प्रहार - Uddhav Thackeray on Amit Shah
  2. "देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल..."; हायकोर्टाचा निकाल दाखवत अनिल देशमुखांचा गंभीर आरोप - Anil Deshmukh On Sachin Waze
  3. "ठाकरे आणि पवारांचे विधान...: पाहा ॲड. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले - Adv Prakash Ambedkar
  4. "भाजपाचा कार्यकर्ता महायुतीविरोधात लढणार..."; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला विधानसभेचा प्लॅन - Chandrashekhar Bawankule

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.