नवी दिल्ली Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे. निर्मला सीतारामन यांनी EPFO पहिल्यांदा नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना जाहीर केली. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयापर्यंत लाभ मिळण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या योजनेचा लाभ हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे.
अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट दिलं आहे. पहिल्यांदाच नोंदणीकृत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीताारमन यांनी थेट लाभ हस्तांतरण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत नवीन थेट लाभ हस्तांतरण म्हणून एक महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्री निर्मलासीतारामन यांनी यावेळी जाहीर केलं. ही योजना ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना 15 000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र 1 लाख रुपयापेक्षा जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. तर एक लाख रुपयापेक्षा कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिलणार आहे.
'इतक्या' कर्मचाऱ्यांना होणार लाभ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केलेल्या थेट लाभ हस्तांतरण योजनेत कर्मचाऱ्यांना थेट 15 हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. देशातील 21 दशलक्ष कर्मचाऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व औपचारिक क्षेत्रात नव्यानं जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचं वेतन या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. EPFO मध्ये पहिल्यांदा नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण 15,000 पर्यंत लाभ मिळणार आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :