नवी दिल्ली- राजधानीवरून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची आज पहाटे ५ वाजून ३५ मिनिटाला धमकी मिळाली. त्यानंतर कोणतीही जोखीम होऊ नये, याकरिता विमान अधिकाऱ्यांनी विमानाला आयसोलेशन बेमध्ये हलविले. क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचले. बॉम्बनाशक पथकानं सर्व विमान प्रवाशांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढलं. विमानाची तपासणी केली असताना कोणतीही स्फोटक वस्तू किंवा बॉम्ब आढळला नाही. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाइट 6E2211 च्या लॅव्हेटरीमध्ये 'बॉम्ब' असा शब्द लिहिलेला टिश्यू पेपर आढळला होता. त्यानंतर तपासणी करण्यात आली."
नवी दिल्लीवरून वाराणसीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांची माहिती
Published : May 28, 2024, 8:08 AM IST