दुसऱ्या पक्षात जाणार तेव्हा स्पष्ट सांगणार - बाबा सिद्दीकी - बाबा सिद्दीकी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/02-02-2024/640-480-20650011-thumbnail-16x9-siddiqui.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 2, 2024, 4:30 PM IST
मुंबई Baba Siddiqui : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी हे आपले पुत्र आमदार झीशान सिद्दीकी (MLA Jheeshan Siddiqui) यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत सत्ताधारी असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या आपण काँग्रेस पक्षातच असल्याचं बाबा सिद्दीकी म्हणाले. (Nationalist Congress Party) यासंदर्भात माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळेस त्यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हणत आपण काँग्रेसमध्येच असल्याचं म्हटलं आहे; मात्र भविष्याबाबत कोणी सांगू शकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
तेव्हा स्पष्टच सांगणारा - बाबा सिद्दीकी : अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत राजकारणापलीकडे आमचे 30 वर्षांपासूनचे संबंध आहेत. सध्या असं काही नसून मात्र भविष्याबद्दल कोणी काहीही सांगू शकत नाही. आता मी काँग्रेसमध्ये आहे; परंतु जेव्हा दुसरीकडे जाईन त्यावेळी निश्चित तुम्हाला सांगेन, असं उत्तर बाबा सिद्दीकी यांनी माध्यमांना दिलं आहे. तसंच ही माहिती कुठून आणली मला माहीत नाही. मला फोन आले त्यावेळेस हे मला समजलं. सध्या याला अफवा समजा. अजित पवार गटाकडून आपल्याला आमंत्रण आलय का? या प्रश्नाला उत्तर देताना बाबा सिद्दीकी म्हणाले की, सगळं तुम्हाला का सांगू. काहीतरी बाकी ठेवावं लागेल, असं मिश्किलपणे सांगून प्रश्नाला बगल दिली.