अहिल्यादेवी होळकर यांनी 300 वर्षांपूर्वी तयार केलेले जलस्रोत आजही जिवंत - Ahilyadevi Holkar - AHILYADEVI HOLKAR
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 31, 2024, 11:05 PM IST
बीड Ahilyadevi Holkar : अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी 31 मे 1725 रोजी झाला. अहिल्यादेवी या लहानपणापासून अत्यंत चंचल होत्या. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवी होळकर यांनी 300 वर्षांपूर्वी तयार केलेले जलस्रोत आजही जिवंत असल्याचे अनेक उदाहरणं महाराष्ट्रात नव्हे तर देशांमध्ये देखील पाहायला मिळतात. त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिरांचे जीर्णोद्धार केले त्या त्या ठिकाणी मंदिराच्या समोर बारव निर्माण केली आणि त्या बारव आजही त्या ठिकाणच्या नागरिकांना जिवंत पाणी देत आहेत. त्यामध्ये जालना येथील काही उदाहरण आहेत. अंबड येथील मत्स्योदरी देवी यांच्या समोर असलेली बारव, बीडच्या खंडेश्वरी देवीसमोर असलेली बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर याच्यासमोर असलेली एक बारव, सर्वसामान्यांचे आराध्य दैवत खंडोबा यांच्या बाजूला असलेला दगडी तलाव आजही अहिल्यादेवींनी केलेल्या कामाची साक्ष देत आहे.
राज्याबाहेरही अहिल्यादेवींचे काम : अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारापुरतच पाहिलं नाही तर राज्याच्या सीमा सोडून देशाच्या पातळीवर काम केल्याचे पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी त्यांनी केलेली कामे आपल्याला पाहायला मिळतात. काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बाजूला जो घाट बांधण्यात आला तो अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला होता. कोलकत्ता ते इंदोर हा राष्ट्रीय महामार्ग अहिल्यादेवी होळकरांच्या काळात झाला. दिल्लीची संसदेची जागा देखील अहिल्यादेवी होळकरांच्या मालकीची होती. पंढरपूर येथील होळकरांचा वाडा आजही साक्षी आहे. पुणे मुंबई महामार्गावर देखील एक मोठी बारव त्यांनी बांधलेली आहे. त्यानंतर श्रीगोंदा येथे देखील एक बारव त्यांनी खोदलेली आहे. त्यामुळे अनेक अशी उदाहरणं या भारतामध्ये आहेत की जी अहिल्यादेवी होळकरांच्या कामाची पावती देत आहे.