पूजा खेडकरांना ज्यांनी-ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करा; विजय कुंभार यांची मागणी - Vijay Kumbhar on Pooja Khedkar - VIJAY KUMBHAR ON POOJA KHEDKAR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 31, 2024, 8:04 PM IST
पुणे Vijay Kumbhar on Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना युपीएससीने आणखी एक दणका दिलाय. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आलीय. तसंच त्यांना यापुढे कोणत्याही सरकारी परीक्षेला बसण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणात सुरुवातीपासून हे प्रकरण समोर आणणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, पूजा खेडकर यांचं प्रशिक्षणार्थी पद काढण्यात आलं आहे. यूपीएससीने ही मोठी कारवाई केलीय. आता हे पद तात्पुरत्या स्वरूपात जरी काढण्यात आलं असलं तरी, पुढे याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसंच त्यांच्यावर झालेली कारवाई ही इथच न थांबता त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई करायला पाहिजे. यूपीएससीने पूजा खेडकर प्रकरणात गुन्हा तर दाखल केला आहे आणि याची चौकशी होऊन कारवाई होणारच आहे. परंतु, या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास व्हायला पाहिजे. आज देशात ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणे राज्याने अश्या बनावट प्रमाणपत्रबनवणाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे असं कुंभार म्हणाले.