राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामुळे तुतारी वादकांना अच्छे दिन, जाणून घ्या कारण - Trumpet Business Increased
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 27, 2024, 10:52 PM IST
पुणे Trumpet Business Increased : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना दिलं. त्यानंतर शरद पवार गटाला तुतारी हे चिन्हं देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर तुतारी वादन करणाऱ्या वादकांसाठी आता अच्छे दिन आले असल्याचं या वादकांकडून सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह दिल्यानंतर पक्षाकडून हे चिन्हं सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेतले जात आहेत. या कार्यक्रमात तुतारी वादकांना देखील तुतारी वादनासाठी बोलवलं जातंय. शिवजयंती, लग्नसमारंभापर्यंत मर्यादित असलेल्या या वादकांना आत्ता ठिकठिकाणी बोलावलं जातं असल्यानं या वादकांना आता अच्छे दिन आले असल्याचं बघायला मिळतंय.