ठाण्यात 27 मजली इमारतीत लागली भीषण आग, गुदमरल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू - Thane Fire News - THANE FIRE NEWS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 11:48 AM IST

ठाणे Thane Fire News : ठाणे शहरात बुधवारी पहाटे 27 मजली निवासी इमारतीतील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. आगीत एका 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, तुळशीधाम सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये पहाटेच्या दरम्यान आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीत फर्निचरसह विविध साहित्य जळून खाक झालंय. फ्लॅटच्या एका खोलीत अरुण केडिया नावाचा एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळुन आला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल. दोन अल्पवयीन मुलांसह घरात उपस्थित असलेले इतर चार जण सुखरूप बाहेर आल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.