"एनडीएसोबत सत्तेत येण्यास उद्धव ठाकरे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार", शिवसेनेचा दावा - Uddhav Thackeray Vs Eknath Shinde - UDDHAV THACKERAY VS EKNATH SHINDE

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 7:12 AM IST

मुंबई Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक जागा मिळाल्या आहेत. पक्षाचं नाव, चिन्ह, आमदार आणि खासदार सर्वकाही गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी नऊ खासदार निवडून आणले. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावलाय. तर दुसरीकडं शिंदे गटातील सहा आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असतानाच आता कोणतेही आमदार ठाकरे गटात जाणार नसल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शहा म्हणाल्या की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षातील सर्वच आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांबरोबर ऑनलाइन नव्हे, तर थेट संपर्क असतो. त्यामुळं शिवसेनेचे आमदार नकली शिवसेनेच्या (उबाठा) संपर्कात असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या पक्षातील सर्वजण हे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळं शिवसेनेच्या आमदारांविषयी उबाठाच्या नेत्यांकडून करण्यात येणारी वक्तव्यं तथ्यहीन आणि खोटी आहेत. याउलट एनडीए पुन्हा सत्तेत येत असल्याचं पाहून उद्धव ठाकरे सत्तेत सामील होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत," असा दावाही शहा यांनी केला. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.